TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावर संकटाचे ढग, वादळी वारे आणि गारपीट; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
मागील काही दिवसांपासून राज्यभरातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. 4 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट भारतीय हवामान विभाग कडून जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर संकटाचे ढग, वादळी वारे आणि गारपीट; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. 4 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
advertisement
2/7
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कोणताही अधिकृत अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र हवामानात बदल होण्याची शक्यता असून काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अधिकृत अलर्ट नाही. तरीही काही भागांत ढगाळ वातावरण राहून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्र पाहिलं तर जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
advertisement
5/7
मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाशिमसह काही उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असली तरी वातावरण ढगाळ राहू शकते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
7/7
एकूणच राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम असून वादळी वारे, वीज आणि पावसामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर संकटाचे ढग, वादळी वारे आणि गारपीट; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल