TRENDING:

CSK vs PBKS : टॉस दरम्यान ऋतुराजने मोठा डाव टाकला, 'मॅचविनर'ची टीममध्ये एंन्ट्री,पंजाबची दाणादाण उडणार

Last Updated:
चेन्नई सुपर किंग्जची या हंगामात सर्वात वाईट सूरूवात झाली होती. कारण राजस्थान रॉयल्सने त्यांचा 8 विकेटने पराभव केला होता.आज चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
advertisement
1/9
टॉस दरम्यान ऋतुराजने मोठा डाव टाकला, 'मॅचविनर'ची टीममध्ये एंन्ट्री,पंजाबची दाणादाण उडणार
आयपीएलमध्ये आता जवळ जवळ सर्वच संघांचे एक एक सामने पार पडले आहेत. त्यात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज भिडणार आहे. हा सामना एम चिंदबरम स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे.
advertisement
2/9
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने चांगली सूरूवात केली होती. पंजाबने आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा 3 विकेट राखून पराभव केला होता.
advertisement
3/9
या विजयानंतर आता पुन्हा दुसरा विजय मिळण्याच्या इराद्याने पंजाब किंग्ज मैदानात उतरणार आहे.
advertisement
4/9
तर चेन्नई सुपर किंग्जची या हंगामात सर्वात वाईट सूरूवात झाली होती. कारण राजस्थान रॉयल्सने त्यांचा 8 विकेटने पराभव केला होता.आज चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
advertisement
5/9
पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
advertisement
6/9
आम्ही प्रथम गोलंदाजी करू. घरच्या मैदानावरचा हा त्यांचा पहिलाच सामना आहे, त्यामुळे गोष्टी कशा घडतात यावर त्यांच्यावर दडपण असेल. मला फक्त सकारात्मक, शांत आणि संयमी राहायचे आहे, नकारात्मकता टाळायची आहे. आमच्याकडे असलेल्या संघामुळे आम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळतो; त्यांचा संघ चांगला असून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, आणि आम्हाला फक्त आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळायचे आहे. जेव्हा परिस्थिती बिकट असते, तेव्हा मला गोलंदाजांना आव्हान द्यायचे आहे; गोलंदाज वरचढ असावेत असे मला वाटत नाही. या वेळीसुद्धा त्याच मानसिकतेने खेळायचे आहे. आपण एकाच संघाविरुद्ध खेळत आहोत, असे श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
advertisement
7/9
टॉस दरम्यान बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, खेळपट्टी बऱ्यापैकी कोरडी दिसतेय.एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, त्यामुळे दव पडण्याची शक्यता नाही. धावफलकावर धावा करणे आणि त्याचे रक्षण करणे चांगले होईल. मागच्या हंगामात आमचा काळ कठीण होता, टी-२० सामन्यात होऊ शकणाऱ्या काही चुका झाल्या. पण ते सर्व आता भूतकाळात जमा झाले आहे; आता प्रत्येक सामना स्वतंत्रपणे खेळून त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. एक फ्रँचायझी म्हणून सीएसकेसाठी हीच गुरुकिल्ली राहिली आहे: एक मजबूत आघाडीची फळी आणि सलामीवीरांकडून चांगली सुरुवात. याच कारणामुळे मी संजू सॅमसनसोबत भागीदारी केली. एक बदल, मॅट शॉर्टच्या जागी प्रशांत वीर खेळेल.
advertisement
8/9
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (डब्ल्यू), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
advertisement
9/9
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
CSK vs PBKS : टॉस दरम्यान ऋतुराजने मोठा डाव टाकला, 'मॅचविनर'ची टीममध्ये एंन्ट्री,पंजाबची दाणादाण उडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल