TRENDING:

Vaibhav sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभववर पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी, या तारखेला टीम इंडियात होणार एन्ट्री!

Last Updated:
Kamran Akmal prediction On Vaibhav suryavanshi : नुकताच 15 वर्षांचा झालेला वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटिंगची जादू दाखवतोय. अशातच आता पाकिस्तानमध्ये देखील वैभवच्या नावाची चर्चा होताना दिसतीये.
advertisement
1/5
Vaibhav sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभववर पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी, या तारखेला टीम इंडियात होणार एन्ट्री!
वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या तिसऱ्या मॅचमध्ये चेन्नईविरुद्ध खेळताना केवळ 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकून सर्वांना थक्क केलं. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर त्याने जबरदस्त बॅटिंग करत फक्त 17 बॉलमध्ये 52 रनची धडाकेबाज खेळी साकारली.
advertisement
2/5
आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटिंगने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर आता जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल याने एका शो दरम्यान वैभवच्या खेळावर भाष्य केलं आहे.
advertisement
3/5
वैभव सूर्यवंशीने अत्यंत कमी वेळात स्वतःला सिद्ध केल्याचं म्हटलं आहे. अकमलच्या मते, जर वैभवने असाच परफॉर्मन्स सुरू ठेवला, तर त्याला लवकरच म्हणजे आयपीएल झाल्यानंतर लगेच टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते.
advertisement
4/5
वैभवने केवळ 8 आयपीएल मॅचमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. कामरान अकमलने त्याच्या नावावर असलेल्या आयपीएल शतकाचाही उल्लेख केला असून, या सिझनंतर भारताच्या आगामी आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये त्याला नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये वैभवने पहिल्या विकेटसाठी यशस्वी जयस्वालसोबत मिळून 6.2 ओव्हरमध्ये 75 रनची पार्टनरशिप केली आणि मॅच पूर्णपणे एकतर्फी करून टाकली. राजस्थान रॉयल्सने चेन्नईने दिलेलं 128 रनचं लक्ष्य केवळ 12.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभववर पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी, या तारखेला टीम इंडियात होणार एन्ट्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल