TRENDING:

ट्रम्पची एक धमकी अन् 19000 रुपयांनी घसरली चांदी, 1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?

Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविषयक संकेतांनंतर सोन्या चांदीचे दर कोसळले, चांदी सुमारे १९००० तर सोनं ४ टक्क्यांनी घसरून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
advertisement
1/6
ट्रम्पची एक धमकी अन् 19000 रुपयांनी घसरली चांदी, 1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
सोन्याचे दर</a>ही घसरले. " width="827" height="620" /> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सकाळी युद्ध इतक्या लवकर थांबणार नाही असे संकेत दिले आणि त्यानंतर शेअर मार्केट आणि सोन्या चांदीचे दर आपटले. सोन्या चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली. चांदी 19000 रुपयांनी क्रॅश झाली तर सोन्याचे दरही घसरले.
advertisement
2/6
चांदीचे दर 2 लाख 38 हजार रुपयांवर आली होती. शुक्रवारी चांदीचे भाव ८ टक्क्यांनी घसरून २,२४,५०० रुपयांवर आले. म्हणजेच प्रति किलोग्राम जवळपास १९,००० रुपयांची घट झाली. रम्यान, गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर व्यवहारादरम्यान सोन्याचे भाव ४ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,४७,१०० रुपयांवर पोहोचले.
advertisement
3/6
दसोन्याच्या दरातील या लक्षणीय घसरणीमुळे गुंतवणूकदारांना, सोने आणि चांदीचे भाव घसरत असताना सुरू असलेल्या स्पर्धेचा विचार करण्यास भाग पडले आहे. शेअर आणि म्युच्युअल फंडमध्येही ज्यांनी सोन्या चांदीमध्ये पैसे गुंतवले त्यांचं नुकसान झालं आहे.
advertisement
4/6
999 शुद्ध सोन्याचे दर 1 लाख 51 हजार रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 39 हजार रुपयांवर आले आहेत. तर 20 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 26 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 13 हजार रुपयांना मिळणार आहे.
advertisement
5/6
GST सह सोन्याचे दर 1 लाख 53 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या बाजारात मागच्या 24 तासांत सोन्यात चार हजार रुपयाची तर चांदीत 10 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
6/6
अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे ग्राहक देखील संभ्रमात आहेत. जळगावच्या बाजारात आज सोनं 4000 रुपयांनी घसरले आहे. सोन्याचे दर हे जीएसटी सह 1 लाख 50 हजार रुपये आहे तर चांदीचे दर 2 लाख 37 हजार प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ट्रम्पची एक धमकी अन् 19000 रुपयांनी घसरली चांदी, 1 तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल