10 वर्षांनी पुन्हा 'देऊळ बंद', आता देवाची परीक्षा! Deool Band 2 ची तारीख लक्षात ठेवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Deool Band 2 : 2015 साली आलेल्या देऊळ बंद फिल्मनंतर प्रेक्षकांना कित्येक वर्षे देऊळ बंद 2 ची प्रतीक्षा होती. अखेर आता या फिल्मची रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
1/7

2015 साली रिलीज झालेली देऊळ बंद. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी फिल्म. श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या फिल्मला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आजही फिल्म पाहिली जाते.
advertisement
2/7
देऊळ बंदचा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी देऊळ बंद 2 ची घोषणा केली होती. अखेर ही फिल्म आता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
advertisement
3/7
'आता परीक्षा देवाची' असं उपशीर्षक या फिल्मचं आहे. त्यामुळे भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
advertisement
4/7
देऊळ बंदच्या पहिल्या भागात गश्मीर महाजन, निवेदिता सराफ, मोहन जोशी यांच्या भूमिका होत्या. आता दुसऱ्या भागात कोणते कलाकार असणार आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
advertisement
5/7
देऊळ बंद प्रमाणेच देऊळ बंद 2 चंही लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडेनं केलं आहे. ज्याच्या देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर 2 या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. आता देऊळ बंद 2 हा त्याचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंकाच नाही.
advertisement
6/7
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित देऊळ बंद 2 चं डिजिटल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. फिल्मची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.
advertisement
7/7
ही फिल्म डिसेंबर 2025 मध्ये रिलीज होणार होती पण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून फिल्मचं शूटिंग थांबवण्यात आलं आणि रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता ही फिल्म 21 मे 2026 रोजी ही फिल्म रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
10 वर्षांनी पुन्हा 'देऊळ बंद', आता देवाची परीक्षा! Deool Band 2 ची तारीख लक्षात ठेवा