TRENDING:

WhatsApp डाउनलोड करताना सावधान! Fake अ‍ॅपने लोकांना केलं जातंय टार्गेट, अलर्ट जारी

Last Updated:
Fake WhatsApp: आजच्या डिजिटल युगात स्कॅमर्स सामान्य लोकांना सहज आपल्या जाळ्यात ओढत आहेत. आता तर बनावट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांच्या फोनमध्ये स्पायवेयर इंस्टॉल केलं जातंय. ज्यामुळे कंपनीने आता अलर्ट जारी केलाय.
advertisement
1/7
WhatsApp डाउनलोड करताना सावधान! Fake अ‍ॅपने लोकांना केलं जातंय टार्गेट, अलर्ट जारी
Fake WhatsApp: सध्याच्या काळात जग डिजिटल होतंय, मात्र स्कॅमर्स याचा फायदा घेत सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत. आता तर फेक व्हॉट्सअॅप अॅपच्या माध्यमातून लोकांनावर निशाणा साधला जातोय. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवरून व्हॉट्सअॅप डाउनलोड करत असाल तर सावधान व्हा. सध्या व्हॉट्सअॅपच्या बनावट अॅपने लोकांना टार्गेट केलं जातंय.
advertisement
2/7
बनावट अॅपच्या माध्यमातून लोकांच्या डिव्हाइसमध्ये स्पायवेयर इंस्टॉल करण्याच्या घटना समोर येत आहेत. ज्यानंतर मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने अलर्ट जारी केलाय. असंही बोललं जातंय की, 200 लोकांच्या फोनमध्ये बनावट अॅप डाउनलोड करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मालवेयर एम्बेडेट आहे. चला या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
3/7
Fake WhatsApp विषयी अलर्ट जारी : मीडिया रिपोर्ट्सनुार, व्हॉट्सअॅपच्या बनावट अॅपने लोकांना टार्गेट केलं जात असल्याची प्रकरणं इटलीमध्ये समोर आली आहेत. कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, आमच्या सिक्योरिटी टीमने इटलीमध्ये जवळपास 200 यूझर्सचा शोध घेतला आहे. ज्यांनी आपल्या फोनमध्ये बनावट अॅप डाउनलोड केले होते.
advertisement
4/7
कंपनी म्हणते की, आम्ही त्या लोकांना लॉग-आउट करत प्रायव्हसीविषयी अलर्ट जारी केलाय. सोबतच त्यांना बनावट अॅपच्या सेफ्टी धोक्यांविषयी माहिती देण्यात आलीये. आम्ही त्यांना फेक अॅप हटवणे आणि ऑफिशियल व्हॉट्सअॅप डाउनलोड करण्यास सांगितलंय. कंपनीने या 200 यूझर्सविषयी जास्त माहिती देण्यास नकार दिलाय.
advertisement
5/7
Fake WhatsApp मागे कोणाचा प्लॅन? : व्हॉट्सअॅप म्हणते की, यूझर्सच्या मोबाईलवर फेक अॅप इंस्टॉल करण्यामागे इंटलीच्या स्पायवेयर तयार करणारी कंपनी SIO चा हात आहे. कंपनीने असंही म्हटलंय की, ते इटॅलियन कंपनीच्या विरोधात लिगल अॅक्शन घेतील. पण स्पायवेयर इंस्टॉल करण्यासाठी पहिल्यांदाच फेक अॅपचा वापर केला जातोय, असं नाही. यापूर्वीही असं केलं गेलं आहे. सर्व्हिलान्स ऑपरेशनमध्ये ही पद्धत खुप सामान्य आहे. येथे यूझर्सच्या फोनमध्ये असे प्रोग्राम इंस्टॉल केले जातात, जे त्यांचा पर्सनल डेटा हॅकर्सपर्यंत पाठवत राहतात.
advertisement
6/7
आपलं WhatsApp अकाउंट सिक्योर कसं ठेवावं? : स्पायवेयर आणि मालेवेयर आदींपासून बचाव करण्यासाठी नेहमी गूगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरसारख्या विश्वासार्ह सोर्सेसने अॅप्स डाउनलोड करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन अॅप्स डाउनलोड करणं टाळा.
advertisement
7/7
पर्सनल डेटा सिक्योर करण्यासाठी नेहमी अॅपला दिलेली परमिशन चेक करा. WhatsApp अकाउंटच्या सिक्योरिटीसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन वापरा. WhatsApp आणि आपल्या फोनचे सॉफ्टवेयर नेहमी अपडेटेड ठेवा. यामुळे सायबर अटॅकचा धोका कमी होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp डाउनलोड करताना सावधान! Fake अ‍ॅपने लोकांना केलं जातंय टार्गेट, अलर्ट जारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल