आता धक्के द्यायची वेळ! राकेश आणि विशालला Bigg Boss Marathi 6 च्या घरातील राडा भोवणार?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 च्या प्रेक्षकांना या आठवड्यात भाऊचा धक्काची प्रतीक्षा जरा जास्तच होती. अखेर तो दिवस आलाच आणि रितेश मोठे धक्के देणार असल्याचंही समोर आलं आहे.
advertisement
1/9

बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्काची प्रतीक्षा तशी प्रत्येक आठवड्याला असते. कारण संपूर्ण आठवड्यात जे काही घडतं, त्यावरून रितेश कुणाचं कौतुक करतो, कुणाचे कान टोचतो, तर कुणाला धक्का देतो. यावेळी भाऊचा धक्काची प्रतीक्षा जरा अधिकच होती. कारण राकेश आणि विशाल यांच्यातील राडा.
advertisement
2/9
राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात काही दिवसांपूर्वी जबरदस्त राडा झाला. नॉमिनेशनवेळी त्यांच्यात जबरदस्त वाजलं. राकेशने नॉमिनेट केलं आणि त्याचं कारण दिल्यानंतर विशाल भडकला. त्यानेही राकेशशी वाद घातला आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
advertisement
3/9
राकेशने विशाल सतत आपल्या आणि घरातील इतर सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो असं कारण देत नॉमिनेट केलं. यावरून विशालने तू माझ्या वयावरून बोलतो, ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे, असं सांगत आरबीच्या घटस्फोटाचा मुद्दा उकरून काढला. यामुळे राकेशचाही पारा चढला.
advertisement
4/9
राकेश आणि विशाल दोघंही एकमेकांशी भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली. घरातील सदस्यांनी त्यांना रोखण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी बिग बॉसलाच मध्यस्थी करावी लागली. बिग बॉसने त्या दोघांना शिक्षाही सुनावली.
advertisement
5/9
या प्रकरणानंतर राकेशच्या कुटुंबाने विशालने घरातील नियम मोडल्याचं सांगत त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. सोशल मीडियावरही विशालविरोधातच जास्त प्रतिक्रिया उमटला.
advertisement
6/9
याशिवाय घरात राकेश आणि राखी, तसंच अनुश्री आणि तन्वी यांच्यातही चांगलंच वाजल्याचं दिसतं आहे. आता भाऊचा धक्कावर रितेश या सगळ्या प्रकरणांवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/9
दरम्यान भाऊचा धक्काचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश म्हणतो, 'बिग बॉसच्या घरात वातावरण गंभीर झालं आहे आणि आता काही धक्के देण्याची वेळ आली आहे' आता रितेश नेमके काय आणि कुणाकुणाला धक्के देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
8/9
सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि त्यानंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री, असा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ज्यात आता फक्त 8 स्पर्धक उरले आहेत. यामध्ये अनुश्री, राकेश, तन्वी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. आता या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
9/9
तसंच बिग बॉस मराठी 6 चा फिनाले कधी होणार हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच रविवारी पार पडणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आता धक्के द्यायची वेळ! राकेश आणि विशालला Bigg Boss Marathi 6 च्या घरातील राडा भोवणार?