TRENDING:

IPL 2026 : चेपॉकवर मुंबई दर्शन! विरार, वाशी, बांद्राची पोरं जमली, कुर्ल्याच्या 'खान ब्रदर्स'चा कल्ला, पाहा Video

Last Updated:

IPL 2026 Mumbai boys At Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सगळी मुंबईची पोरं एका ठिकाणी जमली अन् मॅचआधी सर्वांचा कल्ला पहायला मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 Mumbai boys At Chepauk : भारताच्या क्रिकेटविश्वात जर कोणत्या टीमने सर्वाधिक वर्चस्व गाजवलंय, असा प्रश्न केला तर त्याचं एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे मुंबई... सचिन तेंडूलकरच नाही तर अनेक दिग्गज खेळाडू मुंबई क्रिकेटने देशाला दिले. अशातच आता युवा पिढी देखील हाच वारसा जपताना दिसतीये. आयपीएलमध्ये देखील मुंबई क्रिकेटचा जलवा पहायला मिळतोय. अशातच चेपॉक स्टेडियमवर मुंबईच्या खेळाडूंना कल्ला केल्याचं पहायला मिळालं.
IPL 2026 Mumbai boys At Chepauk enjoying practice
IPL 2026 Mumbai boys At Chepauk enjoying practice
advertisement

मुशीर अन् आयुषची मस्ती

चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सगळी मुंबईची पोरं एका ठिकाणी जमली अन् मॅचआधी सर्वांचा कल्ला पहायला मिळाला. 17 वर्षाचा विरारचा आयुष म्हात्रे मैदानात सरावासाठी येत असताना मुंबईचा युवा खेळाडू कुर्ल्याचा मुशीर खान याने आयुषची गाठ घेतली. दोघांमध्ये स्नेह यावेळी पहायला मिळाला. त्यानंतर एकेक मुंबईचे खेळाडू जमू लागले.

advertisement

IPL इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! श्रेयस अय्यरला 24 लाखांचा दंड, तर PBKS च्या सर्व 12 खेळाडूंना BCCI ने सुनावली शिक्षा

कुर्ल्याचा सरफराज आला अन्...

मुशीर आणि आयुषला पाहून बांद्र्याचा सुयांश शेंडगे दोघांजवळ आला. मग मागे राहिल तो सरफराज कसला... मुशीर खानचा भाऊ आणि कुर्ल्याचा सरफराज आला अन् मैफिलीला रंगत आली. सर्व खेळाडू एकमेकांशी बोलत असताना वाशीचा ऑलराऊंडर अमन खान आला. तर महालक्ष्मीला राहणारा शशांक सिंग तरी कुठे मागे राहणार होता. शशांक सिंग आल्यावर मुंबईच्या पोरींचा गट्टी जमली अन् मस्ती सुरू झाली.

advertisement

मुंबई दर्शनचा व्हिडीओ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा सुंदर असा मुंबई दर्शनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये मुंबई आपलं नाव गाजवतीये, यात कोणतीही शंका नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : चेपॉकवर मुंबई दर्शन! विरार, वाशी, बांद्राची पोरं जमली, कुर्ल्याच्या 'खान ब्रदर्स'चा कल्ला, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल