TRENDING:

डेब्यू फिल्म अन् डायरेक्टरनं साटकन दिली कानाखाली, ओक्साबोक्शी रडली मराठी अभिनेत्री; वडिलांनी बंद पाडलेलं शूटिंग

Last Updated:
नॅशनल अवॉर्ड मिळवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जिच्या डेब्यू फिल्मवेळी भयंकर प्रसंग घडलेला. डायरेक्टरनं तिच्या साटकन कानाखाली दिली होती.
advertisement
1/8
डेब्यू फिल्म अन् डायरेक्टरनं साटकन दिली कानाखाली, ओक्साबोक्शी रडली मराठी अभिनेत्री; वडिलांनी बंद पाडलेलं शूटिंग
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी आज तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते पण तिचा डेब्यू खूपच शॉकिंग होता. पहिल्याच सिनेमाच्या शूटिंगला डायरेक्टरनं पल्लवी जोशीच्या साटकन कानाखाली मारली होती.
advertisement
2/8
पल्लवीने 1973  साली प्रदर्शित झालेल्या 'नाग मेरे साथी' या चित्रपटातून डेब्यू केला. पल्लवीने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला होता. या सिनेमावेळी पल्लवी जोशी फक्त चार वर्षांची होती.
advertisement
3/8
फ्रायडे टॉकीजला दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी जोशीने सांगितले की, अभिनयात रस दाखवल्यानंतर दिग्दर्शक शांतीलाल जोशी यांनी तिला चित्रपटात घेतलं. ते तिच्या वडिलांचे मित्र होते. सचिन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात तिने सारिकाची बालपणीची भूमिका साकारली होती.
advertisement
4/8
एका गाण्याच्या सीनमध्ये लहान पल्लवीला नागदेवतेची प्रार्थना करताना रडायला सांगितले होते. पण रडण्याऐवजी तिला ते संपूर्ण सीन फारच मजेशीर वाट होता.
advertisement
5/8
पल्लवी जोशी म्हणाली, "त्यांनी मला रडायला सांगितले पण मी फक्त हसत होते. अनेक अयशस्वी टेक्सनंतर शांतीलाल काकांनी माझ्या वडिलांना मला कानशिलात मारायला सांगितलं. माझ्या वडिलांनी नकार दिला. त्यांनी कॅमेऱ्याच्या मागून मला रागावल्याचं नाटक केलं. मला माहित होते की ते गंभीर नव्हतं आणि त्यामुळे मला आणखी जोरात हसू आले." पण याच्यानंतर जे घडलं तर पल्लवी जोशी आणि तिच्या वडिलांसाठीही खूप शॉकिंग होतं.
advertisement
6/8
पल्लवी जोशी म्हणाली, "निराश झालेले शांतीलाल काका कॅमेरा चालू असताना आले आणि त्यांनी मला कानशिलात मारली. मी थक्क झाले. मला यापूर्वी कधीही कोणी असं मारलं नव्हतं. संपूर्ण युनिटसमोर मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. मी ओक्शाबोक्शी रडू लागले."
advertisement
7/8
शॉट संपल्यानंतर मी उठले आणि 'मला या चित्रपटासाठी शूट करायचे नाही असं म्हणत ओरडत सुटले. यानंतर पल्लवी जोशीच्या वडिलांचे दिग्दर्शक मित्रासोबत भांडण झालं. पल्लवीचे वडिल चकित झाले होते. त्यांनी दिग्दर्शकाला विचारले, तुम्ही माझ्या मुलीला कानशिलात कशी मारू शकता? शूटिंग थांबवण्यात आले आणि काही दिवस शांततेत गेले असले. पल्लवी शांत झाल्यावर दिग्दर्शकाने अखेर शूटिंग पुन्हा सुरू केलं.
advertisement
8/8
पल्लवी जोशी यांना 1992 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1990 च्या दशकात 'रुक्मावती की हवेली',  'त्रिशाग्नी' आणि 'सौदगर' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे पल्लवी जोशी यांची कारकीर्द समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये बहरली.1992 मध्ये 'वो छोकरी'साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि नंतर तिने श्याम बेनेगल यांच्या 'द मेकिंग ऑफ द महात्मा'मध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डेब्यू फिल्म अन् डायरेक्टरनं साटकन दिली कानाखाली, ओक्साबोक्शी रडली मराठी अभिनेत्री; वडिलांनी बंद पाडलेलं शूटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल