TRENDING:

डान्स करताना धक्का लागला अन् सगळंच बिघडलं; पाच जणांनी घेरलं अन्...पुण्यात ज्येष्ठासोबत भयंकर घडलं

Last Updated:

डान्स करताना लागलेल्या धक्क्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वादातून एका टोळक्याने फिर्यादीच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: औंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. डान्स करताना लागलेल्या धक्क्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या वादातून एका टोळक्याने फिर्यादीच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना लाथाबुक्क्यांनी आणि हाताने मारहाण केली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डान्स करताना धक्का लागल्याने जबर मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
डान्स करताना धक्का लागल्याने जबर मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

इंदिरा गांधी वसाहतीत एक सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी फिर्यादी कुणाल तुजारे यांचे वडील नंदकिशोर तुजारे हे तिथे नृत्य (डान्स) करत होते. डान्स करत असताना त्यांचा धक्का आरोपी प्रमोद घडसिंग याला लागला. याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. धक्का लागल्याच्या रागातून आरोपींनी नंदकिशोर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा कुणाल आणि त्यांचा पुतण्या मध्यस्थी करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी गेले, तेव्हा आरोपींच्या टोळक्याने त्यांनाही सोडले नाही. या टोळक्याने चौघांनाही बेदम मारहाण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

advertisement

रिक्षात प्रवासी भरण्यावरून 2 रिक्षाचालकांत वाद; रागात सिमेंटची वीट उचलून डोक्यात घातली अन्..पुण्यात रक्तरंजित थरार

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुणाल तुजारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भय्या सरोदे, तेजस देवकर, ओंकार पाटोळे (सर्व राहणार: इंदिरा गांधी वसाहत, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

चतुःशृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सार्वजनिक कार्यक्रमात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
डान्स करताना धक्का लागला अन् सगळंच बिघडलं; पाच जणांनी घेरलं अन्...पुण्यात ज्येष्ठासोबत भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल