TRENDING:

AC चं बिल जास्त येतंय? मॅकेनिकला बोलवण्याची गरज नाही, असं करा स्वत:च रिपेअर, पैशांची होईल बचत

Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का? एसीची ही छोटी-मोठी सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्हाला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. तुम्ही स्वतः अगदी 30 मिनिटांत घरच्या घरी तुमचा एसी उन्हाळ्यासाठी तयार करू शकता.
advertisement
1/9
AC चं बिल जास्त येतंय? मॅकेनिकला बोलवण्याची गरज नाही, असं करा स्वत:च रिपेअर, पैशांची होईल बचत
मार्च महिना संपत आला की सूर्याचा कडाका वाढू लागतो आणि मग आठवण येते ती घरातल्या कोपऱ्यात शांत असलेल्या आणि अनेक दिवसांपासून न वापरलेल्या एसीची . गेल्या 3-4 महिन्यांपासून बंद असलेला हा एसी आपण अचानक सुरू करतो, पण अनेकदा तो पाहिजे तसा गारवा देत नाही किंवा त्यातून विचित्र वास येऊ लागतो. अशा वेळी आपण तातडीने मॅकेनिकला फोन लावतो, जो सर्व्हिसिंगच्या नावाखाली हजारो रुपये घेऊन जातो.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहीत आहे का? एसीची ही छोटी-मोठी सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्हाला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. तुम्ही स्वतः अगदी 30 मिनिटांत घरच्या घरी तुमचा एसी उन्हाळ्यासाठी तयार करू शकता. यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, पण एसीची कार्यक्षमता वाढून वीज बिलही कमी येईल. चला तर मग DIY पद्धतीने एसी कसा साफ करायचा, हे जाणून घेऊया.
advertisement
3/9
एसी सर्व्हिसिंग का महत्त्वाची आहे?एसी केवळ हवा थंड करत नाही, तर तो ती हवा फिल्टर सुद्धा करतो. जर फिल्टर आणि कॉइल्समध्ये धूळ, बॅक्टेरिया किंवा बुरशी जमा झाली असेल, तर एसी सुरू करताच ती दूषित हवा संपूर्ण खोलीत पसरते. यामुळे श्वसनाचे विकार किंवा ॲलर्जी होण्याचा धोका असतो. तसेच, घाणेरड्या एसीला हवा थंड करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर म्हणजेच वीज बिलावर होतो.
advertisement
4/9
घरच्या घरी एसी सर्व्हिस करण्याच्या 5 सोप्या स्टेप्स:1. एअर फिल्टरची स्वच्छता:सर्वात आधी एसीची मुख्य पॉवर बंद करा. आता एसीचा पुढचा पॅनेल हळूवार उचलून त्यातील जाळीदार फिल्टर बाहेर काढा. त्यावर धुळीचा जाड थर जमा झालेला दिसेल. हे फिल्टर नळाच्या वाहत्या पाण्याखाली धरून स्वच्छ धुवा. जर जास्त घाण असेल तर सौम्य लिक्विड सोप वापरा. लक्षात ठेवा, फिल्टर पूर्ण कोरडे झाल्याशिवाय परत लावू नका, अन्यथा त्यातून कुबट वास येईल.
advertisement
5/9
2. कूलिंग कॉइल्स साफ करा:फिल्टर काढल्यानंतर तुम्हाला ॲल्युमिनियमच्या बारीक पट्ट्या दिसतील, ज्यांना कूलिंग कॉइल्स म्हणतात. जुन्या टूथब्रशने किंवा मऊ पेंट ब्रशने यावर साचलेली धूळ हळूवार साफ करा. या पट्ट्या वाकणार नाहीत याची काळजी घ्या. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याचा वापर करणे अधिक सोपे पडेल.
advertisement
6/9
3. ड्रेन पाईप तपासा:एसीमधून पाणी गळण्याची समस्या अनेकदा ड्रेन पाईपमध्ये अडकलेल्या कचऱ्यामुळे होते. पाण्याचा निचरा होणारा पाईप कुठे ब्लॉक तर झाला नाही ना, याची खात्री करा. पाईप स्वच्छ असल्यास खोलीत पाणी गळण्याचा धोका टळतो.
advertisement
7/9
4. आऊटडोअर युनिटची काळजी:जर तुम्ही स्प्लिट एसी वापरत असाल, तर बाहेर असलेल्या कंडेंसर युनिटचा पंखा कोरड्या कापडाने किंवा ब्रशने साफ करा. तिथे पालापाचोळा किंवा धूळ साचली असेल तर हवा खेळती राहत नाही, ज्यामुळे कॉम्प्रेसरवर ताण येतो.
advertisement
8/9
5. वायरिंग आणि स्टेबलायझर:अनेक महिने एसी बंद असल्याने उंदीर वायरिंग कुरतडण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व तारा आणि कनेक्शन व्यवस्थित आहेत का, याची एकदा नजर टाकून खात्री करा. सर्व काही ठीक असल्यास फिल्टर पुन्हा लावून पॅनेल बंद करा आणि एसी 5-10 मिनिटे सुरू करून गारवा तपासा.
advertisement
9/9
फायदा काय होईल?घरच्या घरी केलेल्या या साध्या देखभालीमुळे तुमच्या एसीचे आयुष्य वाढेल. मुख्य म्हणजे यामुळे तुमच्या वीज बिलात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. जर या सर्व उपायांनंतरही एसी गारवा देत नसेल, तर मात्र गॅस रीफिलिंगसाठी प्रोफेशनल मॅकेनिकला बोलावणे योग्य ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
AC चं बिल जास्त येतंय? मॅकेनिकला बोलवण्याची गरज नाही, असं करा स्वत:च रिपेअर, पैशांची होईल बचत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल