TRENDING:

Jalgaon: मनी हाईस्ट सीरिजला लाजवेल अशी जळगावात घटना, 6 मिनिटांमध्ये केलं कांड, पोलीस CCTV पाहतच राहिले

Last Updated:

काही वर्षांपूर्वी आलेल्या मनी हाईस्ट सीरिजला लाजवेल अशी ही घटना होती. चोरट्यांनी अवघ्या ६ मिनिटांमध्ये एटीएम मशीन चोरून नेलं.  या एटीएममधील मशीनमध्ये तब्बल १० लााखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: जळगावमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच शहरात एका फायनान्स कंपनीचं  एटीएम मशीन चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या मनी हाईस्ट सीरिजला लाजवेल अशी ही घटना होती. चोरट्यांनी अवघ्या ६ मिनिटांमध्ये एटीएम मशीन चोरून नेलं.  या एटीएममधील मशीनमध्ये तब्बल १० लााखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील  चित्रा चौकात असलेले ऍक्टिवास स्मॉल फायनान्स बँकेचं एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना घडली होती. ३ मार्च रोजी ही घटना घडली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास ४ जण एटीएम सेंटरमध्ये घुसले. सुरुवातील एका चोर आतमध्ये घुसला आणि काही सेकंदात त्याने एटीएम मशीनच्या मागे लावलेल्या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला. पण, एक कॅमेरा हा सुरू होता, हे चोरट्यांना कल्पना नव्हती. एकूण ४ चोर होते. त्यानंतर चोरट्यांनी आणलेलं वाहन हे एटीएम मशीनजवळ आणलं. एका चोराने दोरी आणली आणि एटीएम मशीनला बांधली.

advertisement

एटीएएम मशीनला दोरी बांधल्यानंतर मालवाहू वाहनाने खेचण्याचा प्रयत्न केला पण बाहेर लावलेली काच फुटली. त्यानंतर पुन्हा एकदा वाहनाच्या मदतीने मशीन खेचली असता ती खाली पडली. जशी एटीएम मशीन खाली पडली चार  जणांनी धाव घेतली आणि एटीएम मशीन मालवाहतूक करणाऱ्या टॅम्पोमध्ये भरून फरार झाले.

एटीएम मशीन सापडलं कंडारी गावाच्या जंगलात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
5 वर्षांपूर्वी सुरूवात, तरुणांकडून रावबली जाते स्वच्छतेची मोहीम, ‎‎संभाजीनगरमधील अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

एटीएम मशीन घेऊन चोर फरार झाले होते. सकाळी हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सगळीकडे तपास सुरू केला असता जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंडारी गाव परिसरातील जंगलात चोरून नेलेले एटीएम मशीन मिळून आलं.  एमटीएम मशीन सापडले मात्र मशीन मधील दहा लाखांची रोकड चोरट्यांनी लाबविल्याची माहिती समोर आली आहे. एटीएम मशीन फोडण्यात आलं होतं. चोरांनी मोठ्या शिताफीने चोरी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.   घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. एक पथक तयार करून चोरांचा शोध घेतला जात आहे.  चक्क एटीएम मशीन चोरून नेल्याच्या या घटनेनं पोलिसांच्या गस्तीवर आणि कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: मनी हाईस्ट सीरिजला लाजवेल अशी जळगावात घटना, 6 मिनिटांमध्ये केलं कांड, पोलीस CCTV पाहतच राहिले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल