TRENDING:

5 वर्षांपूर्वी सुरूवात, तरुणांकडून रावबली जाते स्वच्छतेची मोहीम, ‎‎संभाजीनगरमधील अनोखा उपक्रम काय?

Last Updated:

संभाजीनगर फ्लॉगर्स या नावाने ओळखला जाणारा हा ग्रुप दर रविवारी शहरातील विविध भागांमध्ये साफसफाईची मोहीम राबवत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : शहरात स्वच्छतेचा संदेश देत एक तरुणांचा गट गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. संभाजीनगर फ्लॉगर्स या नावाने ओळखला जाणारा हा ग्रुप दर रविवारी शहरातील विविध भागांमध्ये साफसफाईची मोहीम राबवत आहे. दर रविवारी सकाळी साडेसहा वाजता हा ग्रुप ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतो. त्यानंतर शहरातील रस्ते, बागा, ऐतिहासिक स्थळे तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्याचे काम ते करतात.
advertisement

या उपक्रमात अनेक तरुण उत्साहाने सहभागी होत असून, स्वच्छतेबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावरही त्यांचा भर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहरात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता कृतीतून साकार होत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.

निखिल खंडेलवाल यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, आपण सर्वांनी फिरायला आल्यानंतर हातात एक पिशवी घेऊन यावी. आपल्या आसपास दिसणारा कचरा आपणच उचलून स्वच्छता राखावी. आपली जबाबदारी आपणच पार पाडली, तर आपले शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर होईल.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
5 वर्षांपूर्वी सुरूवात, तरुणांकडून रावबली जाते स्वच्छतेची मोहीम, ‎‎संभाजीनगरमधील अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

या ग्रुपचे इंस्टाग्राम वर संभाजीनगर फ्लावर्स नावाने इन्स्टा पेज आहे. याच्यावरून सर्वजण एकत्र येत असतात आणि त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम करत असतात. तर तुम्ही देखील यांच्या ग्रुपला सामील होऊ शकता आणि जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुम्ही त्यांच्या सोबत नक्कीच सामील होऊ शकता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
5 वर्षांपूर्वी सुरूवात, तरुणांकडून रावबली जाते स्वच्छतेची मोहीम, ‎‎संभाजीनगरमधील अनोखा उपक्रम काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल