Aajache Rashibhavishya: हनुमान जयंतीला पालटणार नशीब, संकटे होतील दूर, अचानक मिळेल आनंदाची बातमी, पाहा आजचं राशिभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Aajache Rashibhavishya : मेष ते मीन राशींसाठी गुरुवार खास असेल. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. हनुमानाचा आशिर्वाद तुमच्यावर असेल.हनुमान जन्मोत्सव आहे त्यामुळे हनुमानाची सेवा करा तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ नीच राशीच्या प्रस्थानात असल्यामुळे नात्यामध्ये छोटे मोठे वादविवाद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळा. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी सुद्धा आजचा दिवस खास असणार आहे यांच्यावर सुद्धा बजरंगबलीची कृपादृष्टी असेल बजरंगबलीची आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. अचानक आनंदाची बातमी मिळेल.नवीन संधी निर्माण होतील.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. हनुमानाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या कामाच कौतुक होईल.तुमचा राशी स्वामी बुध अस्थिर असल्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्तक रहा. कामासोबत स्वतःला वेळ द्या.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ योग घेऊन येत आहे.आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतील. अडकलेली कामे मार्गी लागतील.आजच्या दिवशी हनुमानाची सेवा करा हनुमानाच्या आशीर्वादाने संकटे दूर होतील.प्रवासाचा योग आहे.
advertisement
5/13
सिंह राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येत आहे.त्यामुळे तुम्हाला नवी काही सुरुवात करण्याची असल्यास आजचा दिवस उत्तम आहे. ग्रहांच्या योगामुळे मिळकतीची मार्ग वाढण्याची शक्यता आहे.आज दिवसभर कामाची धावपळ असेल त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे.तुमचा राशीस्वामी बुध तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल.अचानक आनंदाची बातमी मिळेल. बजरंगबलीची सेवा करा ती तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
advertisement
7/13
तूळ राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तीची मदत तुम्हाला कामामध्ये होणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल .आरोग्याच्या समस्या जाणून शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. एकूणच आजचा दिवस तुमचा समाधानकारक जाणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे.वृश्चिक राशीसाठी पंचम शनी आणि एकादश स्थानातील चंद्राचा योग अजून सात दिवस राहणार आहे. त्यामुळे आरोग्य संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाचा अति ताण घेऊ नका. नियोजनबद्ध पद्धतीने कामे करा.अचानक खर्चामुळे बजेट बिघडू शकते.
advertisement
9/13
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी चालून येतील आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, मात्र मोठा धोका असलेल्या व्यवहारांपासून दूर राहणं जास्त योग्य ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि नातेवाईकांशी असलेले संबंधही अधिक चांगले होतील.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.अनेक सकारात्मक बदल होतील.छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परंतु काळजी नसावी यातून तुम्ही मार्ग काढाल. हनुमानाची सेवा करा ती तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.प्रवासाचा योग आहे. नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे त्या संधीचा फायदा घ्या.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस अस्थिर असण्याची शक्यता आहे .कुंभ राशीचा स्वामी शनी मार्गी अवस्थेत असल्यामुळे वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.त्यामुळे संयम बाळगा.आज मानसिक अस्थिरता जाणवेल कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे बजरंगबलीची सेवा करा. हनुमान चालीसा ऐका त्यामुळे तुमच्यातली नकारात्मक भावना दूर होण्यास मदत होईल.
advertisement
12/13
आजचा दिवस तुमच्यासाठी सावध राहण्याचा आहे. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या, कारण नुकसान किंवा फसवणुकीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव जाणवू शकतो, पण तुम्ही शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल.आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती आणि सकारात्मक विचार गरजेचा आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: हनुमान जयंतीला पालटणार नशीब, संकटे होतील दूर, अचानक मिळेल आनंदाची बातमी, पाहा आजचं राशिभविष्य