Health Tips : वाढत्या वजनाचा होतोय त्रास, हे करा घरगुती उपाय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट्स, सप्लिमेंट्स किंवा औषधांचा वापर करताना अनेक जण पाहायला मिळतात. पण, योग्य जीवनशैली आणि घरगुती उपायांमुळे देखील वजन नियंत्रित करता येते.
advertisement
1/7

दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसत आहे. लठ्ठपणामुळे शरीराला डायबेटीस, हार्ट डिसीज, मेंदूचे आजार, डोळ्यांच्या समस्या इत्यादी आजार होऊ शकतात. त्यामुळे बदलती जीवनशैली, कमी शारीरिक हालचाल, वेळेवर न खाणे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन या सगळ्यांचा परिणाम शरीरावर होतो.
advertisement
2/7
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट्स, सप्लिमेंट्स किंवा औषधांचा वापर करताना अनेक जण पाहायला मिळतात. पण, योग्य जीवनशैली आणि घरगुती उपायांमुळे देखील वजन नियंत्रित करता येते. लोकल 18 ने याबाबत बीड शहरातील डॉक्टर नागेश झांजुर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेतली.
advertisement
3/7
डॉ. झांजुर्णी सांगतात की, सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीर हलके वाटते आणि पचनाची क्रिया सुधारते.
advertisement
4/7
तसेच तुम्ही ग्रीन टी आणि मेथीदाण्याचे पाणी प्यायले तरी उपयोगी ठरते. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, ते चरबी जाळण्यास मदत करतात. मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते.
advertisement
5/7
वजन नियंत्रणासाठी आहारात काही बदल करणे उपयुक्त ठरते. यामध्ये जेवणाच्या वेळा पाळणे, गोड पदार्थ कमी खाणे, तेलकट पदार्थांचा मर्यादित वापर, भरपूर पाणी पिणे आणि ताज्या फळभाज्या खाणे, या गोष्टींचा अवलंब केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे पचन नीट होते आणि आपण खाल्लेलं अन्न शरीरात चरबीच्या स्वरूपात साठत नाही.
advertisement
6/7
याबरोबरच नियमित व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. तुम्ही दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योगासने किंवा सूर्यनमस्कारासारखे सोपे पण प्रभावी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट बर्निंग जलद होते. डॉ. झांजुर्णी यांनी असंही सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणे बंधनकारक नाही. तुम्ही घरच्या घरी नियमितपणे हलकासा व्यायाम करू शकता. विशेषतः प्राणायामामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
advertisement
7/7
वजन कमी करण्यासाठी संयम, सातत्य आणि सकारात्मक मानसिकता अत्यंत गरजेची आहे. घरगुती उपाय हे खर्चिक नसतात. त्यात सातत्य ठेवल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि आरोग्यवर्धक असतात. वजन नियंत्रित ठेवून अनेक आजारांपासून आपले संरक्षण करता येते, असं झांजुर्णी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : वाढत्या वजनाचा होतोय त्रास, हे करा घरगुती उपाय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला