TRENDING:

Team India Schedule : IPLनंतरही टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही,BCCI कडून नवं वेळापत्रक जाहीर

Last Updated:
आयपीएलनंतर दोन महिने क्रिकेट खेळल्यानंतर टीम इंडियाला काहिशी विश्रांती मिळेल असे वाटत होते. पण बीसीसीआयने टीम इंडियाच एकदम व्यस्त वेळापत्रक बनवलं आहे.
advertisement
1/9
IPLनंतरही टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही,BCCI कडून नवं वेळापत्रक जाहीर
आयपीएल 2026 ला नुकतीच सूरूवात झाली आहे. ही लीग आता जवळपास 2 महिने खेळवली जाणार आहे.
advertisement
2/9
आयपीएल 2026 चा फायनल सामना हा 31 मे 2026 ला खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू दोन महिने प्रचंड व्यस्त असणार आहे.
advertisement
3/9
आता दोन महिने क्रिकेट खेळल्यानंतर टीम इंडियाला काहिशी विश्रांती मिळेल असे वाटत होते. पण बीसीसीआयने टीम इंडियाच एकदम व्यस्त वेळापत्रक बनवलं आहे.
advertisement
4/9
आयपीएलनंतर लगेचच अफगाणिस्तान भारत दौऱ्यावर येणार आहे. हा या दौऱ्यात अफगाणिस्तान भारतासोबत एक टेस्ट आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा आयपीएलच्या समाप्तीनंतर 6 दिवसांनी म्हणजेच 6 जूनपासून सूरू होणार आहे, आणि तो 20 जुनला समाप्त होईल.
advertisement
5/9
या दौऱ्याच्या समाप्तीनंतर लगेचच टीम इंडिया सात दिवसांनी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया फक्त दोन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला 26 जूनपासून सूरुवात होऊन तो 28 जूनला संपणार आहे. हे संपूर्ण झालं जून महिन्याच शेड्युल.
advertisement
6/9
28 जूननंतरही टीम इंडियाला विश्रांतीची वेळ मिळणार नाही आहे. कारण आयर्लंड नंतर टीम इंडिया थेट इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. हा दौरा 1 जूलै 2026 पासून सूरू होऊन 19 जुलै 2026 पासून खेळवला जाणार आहे.
advertisement
7/9
या दौऱ्याच्या समाप्तीनंतर टीम इंडियाकडे जवळ जवळ 40 दिवसांचा मोठा ब्रेक होता.कारण ऑगस्टमध्ये टीम इंडियाचा एकही दौरा नव्हता आणि जुलै 19 जुलैनंतर इंग्लंड दौरा संपताच टीम इंडियाला विश्रांती मिळणार होती.
advertisement
8/9
पण बीसीसीआयने जुलैच्या उरलेल्या या 11 दिवसातही आणखी एका दौऱ्याचे आयोजन केले आहे. इंग्लंड नंतर टीम इंडिया झिम्बाबेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने आजच या दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
advertisement
9/9
बीसीसीआयच्या या घोषणेमुळे टीम इंडियाच वेळापत्रक आणखी व्यस्त झालं आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या खेळाडूंना आता थेट 4 महिन्यांनी म्हणजेच जुलैनंतर विश्रांती मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India Schedule : IPLनंतरही टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही,BCCI कडून नवं वेळापत्रक जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल