TRENDING:

बजरंगबली डुलला म्हणून 'डुल्या'! मग बटाट्या, भांग्या, उंटाड्या ही नावं मारुतीला का पडली? जाणून घ्या भन्नाट कथा

Last Updated:
पुण्यात काही प्रसिद्ध हनुमान मंदिरे आहेत जी त्यांच्या आगळ्यावेगळ्या नावांसाठी प्रसिद्ध आहेत. उद्या हनुमान जयंती असून या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध हनुमान मंदिरांना अशी नावं का पडली हे जाणून घेऊ.
advertisement
1/9
बजरंगबली डुलला म्हणून 'डुल्या'! मग बटाट्या, भांग्या, उंटाड्या ही नावं मारुतीला का पडली? जाणून घ्या भन्नाट कथा
महाराष्ट्रात अशी अनेक शहर आहेत जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. मुंबई, पुणे ही अशी शहरं आहेत जी त्यांच्या औद्योगिककरणामुळे प्रसिद्ध आहेतच शिवाय आणखी काही वेगळ्या गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहेत. पुणे हे शहर व्यापार आणि उद्योगाव्यतिरिक्त समृद्ध इतिहासासाठी ओळखले जाते. पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे. पुण्यात काही प्रसिद्ध हनुमान मंदिरे आहेत जी त्यांच्या आगळ्यावेगळ्या नावांसाठी प्रसिद्ध आहेत. उद्या हनुमान जयंती असून या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध हनुमान मंदिरांना अशी नावं का पडली हे जाणून घेऊ.
advertisement
2/9
बटाट्या मारुती: पुण्यातील शनिवार वाडा येथील मैदानात हे मंदिर आहे. पेशव्यांच्या काळात या मैदानात शनिवारी बटाटा- कांद्यांचा मोठा बाजार भरत असे. यामुळे या मंदिराला बटाटा मारूती म्हणतात.
advertisement
3/9
भांग्या मारूती: श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारूतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात गांजा विकला जात होता असे सांगितले जाते. यामुळे या मंदिराला भांग्या मारुती नाव पडले.
advertisement
4/9
उंटाड्या मारूती: पुण्यातील अनेक भागात प्राचीन मंदिरे आहेत. पुण्याच्या रास्ता पेठेत पेशव्यांच्या फोजेला उंट बांधून ठेवण्याची जागा होती. यामुळे जवळच असलेल्या मारूती मंदिराला उंटाड्या मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
5/9
डुल्या मारूती: हे मंदिर लक्ष्मी रोडवर आहे. या मंदिराचा इतिहास साडेतीन शतकांपूर्वीचा आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात माराठ्यांची अहमदशहा अब्दालाहशी युद्ध झाले. या युद्धात ही हनुमानाची मूर्ती हलायला लागली होती. यामुळे या मंदिराला डुल्या मारूती असं नाव पडलं.
advertisement
6/9
जिलब्या मारूती: पुण्यातील तुळशीबागेजवळ असलेल्या हनुमान मंदिराला जिलब्या मारूती म्हणून ओळखले जाते. जून्या काळी या परिसरात जिलेबी बनवणारे लोक राहत असे. यामुळे या मंदिराला असे नावं पडलं.
advertisement
7/9
पत्र्या मारूती: या मंदिरात 1867 पासून टिनपत्रे आहेत. असे मानले जाते की ससून हॉस्पिटलच्या बांधकामाच्या दरम्यान टिनपत्रे मागवण्यात आली होती. तेव्हा काही पत्रे मंदिरात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून या मंदिराला पत्र्या मंदिर बोलले जाते.
advertisement
8/9
दुध्या मारुती: शुक्रवार पेठेत ‘दुध्या मारुती’चं मंदिर आहे. पूर्वीच्या वेळी या परिसरात गायी-म्हशींचा गोठा होता. मोठ्या प्रमाणात दूध-तूप उपलब्ध होत असे. आजूबाजूचे देव पाण्याचे न्हायचे, मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने न्हावू घालायचा, त्यामुळे या मारुतीला ‘दुध्या मारुती’ नाव पडलं.
advertisement
9/9
खरकट्या मारुती: लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक, शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत. त्यावरून या मारुतीला ‘खरकट्या मारुती’ नाव पडलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
बजरंगबली डुलला म्हणून 'डुल्या'! मग बटाट्या, भांग्या, उंटाड्या ही नावं मारुतीला का पडली? जाणून घ्या भन्नाट कथा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल