Rinku Rajguru : रिंकूचं सगळं सत्य फक्त तिलाच माहिती! आई नाही, बहीण नाही, मैत्रीण नाही; मग ती कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या आयुष्यात ती कोण आहे जिला रिंकूच्या आयुष्यातील सगळी सत्य माहिती आहेत? रिंकूने स्वत:च सांगितलं.
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच तिच्या साधेपणामुळे ओळखली गेली आहे. सोशल मीडियावरही ती चाहत्यांशी जोडलेली असते. मात्र यावेळी रिंकूने शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
2/8
रिंकू तिच्या आईच्या खूप जवळ आहे. आयुष्यातील अनेक गोष्टी ती आईसोबत शेअर करते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही ती आईशी मोकळेपणाने बोलते. तिने स्वत: याबद्दल अनेकदा सांगितलं आहे.
advertisement
3/8
पण याच रिंकूच्या आयुष्यातील काही सत्य आहेत जी ना तिच्या आईला माहिती आहे ना बहिणीला ना मैत्रिणींना. त्यामुळे नेमकं तिचं खरं सत्य कोणाला माहिती आहे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
4/8
रिंकूच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये कुतूहल वाढलं आहे. ती कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर रिंकूच्या पोस्टमधून मिळालं आहे.
advertisement
5/8
रिंकूच्या आयुष्यातील ती म्हणजे तिची सावली ( शॅडो). रिंकूने अलीकडेच एक खास फोटो शेअर होता. या फोटोमध्ये तिची सावली (शॅडो) दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहिलं, "माझ्या सावलीला माझं खरं सत्य माहिती आहे."
advertisement
6/8
काही दिवसांआधीच रिंकूने एका मुलाखतीत बोलताना तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. तिचं ब्रेकअप झालं असून आता तिला प्रेमात पडायची भीती वाटते असं ती म्हणाली होती. त्याचप्रमाणे जेन झी रिलेशनशिपमध्ये तिचा अजिबात रस नाही असंही तिने सांगितलं.
advertisement
7/8
दरम्यान रिंकू राजगुरू कामा विषयी सांगायचं झाल्यास ती सातत्यानं स्क्रिनवर दिसतेय. फेब्रुवारी महिन्यात तिचा 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तिनं मराठी दिग्गज कलाकारांबरोबर पहिल्यांदा काम केलं.
advertisement
8/8
त्याआधी रिंकूचा 'आशा' या सिनेमात रिलीज झाला होता. या सिनेमात तिने आशा सेविकांची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : रिंकूचं सगळं सत्य फक्त तिलाच माहिती! आई नाही, बहीण नाही, मैत्रीण नाही; मग ती कोण?