TRENDING:

...तर तुमचा LPG बंद होणार! महाराष्ट्रात गॅस पाइपलाईनच्या कामाला वेग, राज्य सरकारचे मोठे आदेश

Last Updated:

'सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन' नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जागतिक घडामोडींमुळे एलपीजी (LPG) पुरवठ्यावर मर्यादा आल्याने महाराष्ट्र सरकारने 'सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन' (CGD) नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पाइपलाईनसाठीच्या प्रलंबित परवानग्या आता 'मंजूर' समजल्या जातील आणि नवीन अर्जांना २४ तासांत मंजुरी दिली जाईल. कामाला गती देण्यासाठी रस्ते पूर्ववत करण्याचे शुल्क माफ करण्यात आले असून कंपन्यांना २४ तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पाईप नॅचरल गॅस
पाईप नॅचरल गॅस
advertisement

तसेच, आता अग्निशमन दल किंवा वाहतूक पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) गरज भासणार नाही. सर्व अटी शर्ती, परवानग्या शिथिल करण्यात आल्या आहेत. आतापासून PNG (piped natural gas) ला पाणी, वीज प्रमाणे अत्यावश्यक सेवा मानली जाईल. हॉटेल, शाळा, हॉस्पिटल्स, कम्युनिटी किचन, वसतिगृह यांना कमर्शियल दराने 50 टक्के सप्लाय करू, मात्र डोमेस्टिक वापराला प्राधान्य असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

advertisement

या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नागरी पुरवठा संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे नागरी पुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

...तर LPG बंद होऊ शकतो

भारत सरकारच्या निर्देशान्वये आपण पीएनजीचे (पाईप नॅचरल गॅस) वेगात काम सुरू केले असून येत्या तीन महिन्यात शक्य तिथे पीएनजी जोडणीवर भर देणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. शक्य असूनही पीएनजी गॅस घेतला नाही तर LPG बंद होऊ शकतो असा उघड इशाराच सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

advertisement

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा आजचा साठा

पेट्रोल (MS) 1,86,386 KL

डिझेल (HSD) 4,03,268 KL

LPG 27,209 MT

केरोसिन (SKO) 4,000 KL

रोजचा पुरवठा

पेट्रोल 27,006 KL

डिझेल 69,506 KL

LPG 9,129 MT

PNG 1.34724 MMSCMD

रोजचा वापर (Daily Sales)

पेट्रोल 23,670 KL

डिझेल 60,052 KL

LPG 10,493 MT

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

PNG 0.75575 MMSCMD

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर तुमचा LPG बंद होणार! महाराष्ट्रात गॅस पाइपलाईनच्या कामाला वेग, राज्य सरकारचे मोठे आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल