TRENDING:

Grapes : घरच्या घरी द्राक्षांपासून कसे बनवाल मनुका? 1 किलोसाठी किती द्राक्ष लागतील, प्रमाण आणि पद्धत लगेच जाणून घ्या

Last Updated:
अनेकदा आपण बाजारातून महागडे मनुका विकत आणतो, पण त्यावर अनेकदा रासायनिक प्रक्रिया केलेली असते किंवा ते हवे तसे मऊ नसतात. मग विचार करा, जर हेच मनुका तुम्ही घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवले तर?
advertisement
1/12
Grapes : घरच्या घरी द्राक्षांपासून कसे बनवाल मनुका? 1 किलोसाठी किती द्राक्ष लागतील, प्रमाण आणि पद्धत लगेच जाणून घ्या
उन्हाळा सुरू झाला की बाजारात ठिकठिकाणी द्राक्षांचे ढिग दिसू लागतात. रसरशीत, गोड आणि आंबट अशा चवीची द्राक्षे खायला सर्वांनाच आवडतात. पण हीच द्राक्षे जेव्हा सुकवली जातात, तेव्हा त्यापासून तयार होतात ते म्हणजे मनुका किंवा मणूके. खीर असो, हलवा असो किंवा सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी, मनुका आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
advertisement
2/12
अनेकदा आपण बाजारातून महागडे मनुका विकत आणतो, पण त्यावर अनेकदा रासायनिक प्रक्रिया केलेली असते किंवा ते हवे तसे मऊ नसतात. मग विचार करा, जर हेच मनुका तुम्ही घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवले तर? ते स्वस्त तर पडतीलच, पण चवीलाही अधिक रसरशीत आणि ताजे असतील. चला तर मग, जाणून घेऊया घरच्या घरी मनुका बनवण्याची परफेक्ट पद्धत.
advertisement
3/12
1 किलो मनुकासाठी किती द्राक्षे लागतील?घरच्या घरी मनुका बनवताना सर्वात आधी मनात येणारा प्रश्न म्हणजे प्रमाणाचा. द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे सुकल्यानंतर त्यांचे वजन बरेच कमी होते. साधारणपणे 1 किलो ताजी द्राक्षे वापरली तर त्यापासून 500 ग्रॅम (अर्धा किलो) किशमिश तयार होतात. म्हणजे जितकी द्राक्षे, त्याच्या निम्मे मनुका मिळतात.
advertisement
4/12
मनुका बनवण्यासाठी नेहमी पातळ सालीची, गोड आणि पूर्ण पिकलेली द्राक्षे निवडा. गोल आकाराच्या द्राक्षांपासून बनलेले मनुका जास्त मऊ आणि ज्युसी होतात.
advertisement
5/12
अशी आहे बनवण्याची सोपी प्रक्रियाBhavnasfoodjourneyया संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया अत्यंत साधी आहे:
advertisement
6/12
1. स्वच्छता: सर्वात आधी द्राक्षे देठापासून वेगळी करा आणि ती स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या.
advertisement
7/12
2. वाफवणे किंवा उकळणे: एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात द्राक्षे टाका. 3-4 मिनिटे द्राक्षे शिजू द्या. जेव्हा द्राक्षे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागतील, तेव्हा समजावे की ती तयार आहेत. जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा त्यांचा पोत खराब होईल.
advertisement
8/12
3. सुकवणे: शिजलेली द्राक्षे गाळणीने उपसून घ्या आणि थोडी थंड होऊ द्या. त्यानंतर एका सुती कापडावर किंवा ट्रेमध्ये एक-एक द्राक्ष सुट्टे करून पसरवा.
advertisement
9/12
4. उन्हात वाळवणे: ही द्राक्षे कडक उन्हात वाळवा. साधारणपणे 1 ते 2 दिवसांत ही द्राक्षे सुकून त्यांचे मनुका तयार होतात. मधून मधून त्यांना पलटत राहा, जेणेकरून ती सर्व बाजूंनी व्यवस्थित सुकतील.
advertisement
10/12
साठवणूक कशी करावी?जेव्हा द्राक्षे पूर्णपणे सुकतील पण थोडी मऊ असतील, तेव्हा तुमचे घरगुती मनुका तयार आहेत. हे मनुका एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे मनुका वर्षभर आरामात टिकतात.मनुकामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरी जास्त असतात, त्यामुळे रोजच्या आहारात त्यांचे मर्यादित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
advertisement
11/12
बाजारच्या भेसळयुक्त मनुकापेक्षा घरच्या घरी बनवलेले हे मनुका आरोग्यासाठी उत्तम आणि खिशाला परवडणारे आहेत. या उन्हाळ्यात ही ट्रिक नक्की ट्राय करून पाहा.
advertisement
12/12
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Grapes : घरच्या घरी द्राक्षांपासून कसे बनवाल मनुका? 1 किलोसाठी किती द्राक्ष लागतील, प्रमाण आणि पद्धत लगेच जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल