पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की, 'अमुल' या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द केवळ एका कंपनीचे नाव नसून त्यामागे एक मोठा इतिहास आणि एक महत्त्वाचा फुलफॉर्म दडलेला आहे.
अमुल (Amul) चा फुलफॉर्म काय आहे?
'Amul' या शब्दाचा फुलफॉर्म खालीलप्रमाणे आहे:
A - Anand (आनंद)
M - Milk (मिल्क - दूध)
advertisement
U - Union (युनियन - संघ)
L - Limited (लिमिटेड)
याचा पूर्ण अर्थ होतो. 'आनंद मिल्क युनियन लिमिटेड' (Anand Milk Union Limited).
आनंदचा अर्थ काय?
अमुलची सुरुवात गुजरात राज्यातील आनंद (Anand) या शहरातून झाली, म्हणूनच या नावाच्या सुरुवातीला आनंद हा शब्द येतो. आज या शहराला भारताची दूध राजधानी म्हटले जाते.
गंमत म्हणजे, संस्कृतमध्ये अमूल्य (Amulya) या शब्दाचा अर्थ ज्याची किंमत करता येणार नाही किंवा मौल्यवान असा होतो. अमुलचे नाव या संस्कृत शब्दाशी मिळतेजुळते ठेवण्यामागे हेच कारण होते की, हे दूध आणि त्यातून मिळणारा परतावा शेतकऱ्यांसाठी अमूल्य ठरावा.
1946 मध्ये जेव्हा शेतकऱ्यांचे मध्यस्थांकडून शोषण होत होते, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्रिभुवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली या सहकारी संस्थेची स्थापना झाली. पुढे डॉ. वर्गीस कुरियन यांनी या चळवळीला व्यावसायिक रूप दिलं.
डॉ. वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेतक्रांतीचे जनक (Father of White Revolution) मानले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज अमुल ही जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था बनली आहे, जिथे नफा थेट शेतकऱ्यांच्या खिशात जातो.
अमुल गर्ल आणि जाहिरातींचा प्रवास
अमुलचा उल्लेख अमुल गर्लशिवाय अपूर्ण आहे. 1966 मध्ये पहिल्यांदा ही चिमुकली मुलगी जाहिरातींमध्ये दिसली. अटर्ली बटरली डिलिशिअस ही टॅगलाईन आजही लोकांच्या जिभेवर आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवर मिश्किल टिप्पणी करणाऱ्या अमुलच्या जाहिराती आजही जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या जाहिरात मोहिमांपैकी एक आहेत.
एक लहानसे गाव, काही शेतकरी आणि दोन टँकर दूध... इथून सुरू झालेला आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच अमुलचा प्रवास आज अब्जावधींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यात या नावाचा वाटा खरोखरच अमूल्य आहे.
