TRENDING:

APMC Market: युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, द्राक्ष अन् कांद्याला काय मिळतोय भाव?

Last Updated:

आखातातील युद्धामुळे केळीसह द्राक्ष, कांदा आणि सर्वच भाजीपाला उत्पादक संकटात आहेत. आज 31 मार्च रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 59 हजार 127 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसतो आहे. सध्या शेतकऱ्यांकडून केवळ एक ते दीड रुपये प्रतिकिलोने कच्च्या केळीची खरेदी होत आहे. तर हीच केळी व्यापारी ग्राहकांना 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्राहकांची लूट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
advertisement

आखातातील युद्धामुळे केळीसह द्राक्ष, कांदा आणि सर्वच भाजीपाला उत्पादक संकटात आहेत. आज 31 मार्च रोजी राज्याच्या मार्केटमध्ये 59 हजार 127 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये दोन क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. त्यास मिळालेला 1650 रुपये आजचा सर्वाधिक कांद्याचा बाजारभाव ठरला. तसेच बाजारातील लाल कांद्याचा सरासरी भाव 700 ते 1600 रुपये दरम्यान राहिला. उन्हाळी कांद्याचा बाजारभाव 800 ते 914 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.

advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 740 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 350 क्विंटल लिंबूस 3500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल कागदी लिंबूस 14000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

View More

द्राक्ष आवक

राज्याच्या मार्केटमध्ये द्राक्ष आवक वाढली आहे.आज 1685 क्विंटल द्राक्षाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 953 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 9500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सांगली बाजारात आवक झालेल्या 9 क्विंटल द्राक्षास 4500 प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

मुंबई मार्केटमध्ये 48 क्विंटल कच्च्या केळीची आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2200 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. राज्याच्या मार्केटमध्ये केळीची केवळ 329 क्विंटल एकूण आवक राहिली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 240 क्विंटल केळीची सर्वाधिक आवक झाली. त्यास 1600 रुपये बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, द्राक्ष अन् कांद्याला काय मिळतोय भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल