TRENDING:

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत 14 वर्षात असं कधीच झाले नाही, कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी?

Last Updated:

मुंबईकरांचा घर खरेदीकडे सर्वाधिक कल पाहायला मिळत आहे. मार्च 2026 मध्ये, मालमत्तेच्या नोंदणीमध्ये गेल्या 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईकरांचा घरखरेदीकडे सर्वाधिक कल पाहायला मिळतोय, याचा परिचय मार्च 2026 मध्ये आला आहे. मार्च 2026 मध्ये, मुंबईमध्ये  सर्वाधिक मालमत्तेची नोंदणी करण्यात आलेली आहे. मार्च 2026 मध्ये, 15,500 हून अधिक घरांच्या नोंदणींसह आर्थिक वर्षाचा दमदार शेवट केला आहे. गेल्या 14 वर्षांमधील सर्वाधिक नोंदणीचा रेकॉर्ड मोडला आहे.
Property Rules
Property Rules
advertisement

महाराष्ट्राच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत या मार्च महिन्यामध्ये 15,516 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीतून बीएमसीला 1,492 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्काची कमाई केलेली आहे. मार्च महिन्यातली आकडेवारी काही प्रमाणावर जास्त आहे. घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नोंदणी काही प्रमाणावरच वाढ झाली असून मुद्रांक शुल्क संकलनात 6% ने घट झाली आहे. हा बदल मालमत्ता व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावरचा बदल दर्शवते. फेब्रुवारी 2026 च्या तुलनेत मार्च महिन्यातील नोंदणीमध्ये 19% वाढ झाली आहे. तर मुद्रांक शुल्काच्या कलेक्शनमध्ये महिन्यागणिक 32% ची वाढ झाली आहे. एकूण नोंदणींपैकी जवळपास 80% नोंदणी घरांची झालेली आहे. 1000 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या आकाराच्या अपार्टमेंट्सना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भिकारदास मारुती मंदिर, तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रात कुठे? 215 वर्षे आहे जुनं!
सर्व पहा

नोंदणीच्या व्यवहारांमध्ये 1000 स्क्वेअर फुटांच्या घरांचा सुमारे 85% वाटा होता. ही विक्री मोठमोठ्या शहरातलीच आहे. घरांच्या सर्वाधिक विक्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय. मुंबईत घर घेणं आजच्या घडीला जेवढं मुश्कील असलं तरीही वर्षानुवर्षे हाच आकडा वाढताना दिसत आहे. या आकड्यामुळे मुंबईकरांना सर्वाधिक घरे कोणत्या पद्धतीचे आवडतात, ही गोष्ट मात्र आता स्पष्ट झालीये. दरम्यान, मुंबईतील कोणत्या भागामध्ये सर्वाधिक कमाई झाली आहे, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत 14 वर्षात असं कधीच झाले नाही, कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल