TRENDING:

Weather Alert: आता वादळी वारे वाहणार, गारांचा पूर येणार; महाराष्ट्रात 33 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
हवामान विभागाने 1 एप्रिल रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 27 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विभागानुसार हवामान कसे असेल, पाहूयात.
advertisement
1/7
 आता वादळी वारे वाहणार, गारांचा पूर येणार; महाराष्ट्रात 33 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्राला मार्च महिन्यात अवकाळी पावसाने झोडपल्याचे पाहायला मिळाले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 1 एप्रिल रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 27 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विभागानुसार हवामान कसे असेल, पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसला तरी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस कोसळेल. ताशी 30-40 किमी वेगवान वारे वाहतील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. दुपारनंतर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिवला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा आणि वाशिमलाही अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
7/7
एकूणच, राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार असून हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, घराबाहेर पडणे टाळावे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: आता वादळी वारे वाहणार, गारांचा पूर येणार; महाराष्ट्रात 33 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल