फ्रिज खरेदी करताय? आधी 'हे' वाचा, नाही तर डबल येईल वीज बील
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळा सुरू झाला की, फ्रिजची गरज वाढते. काही लोक तर नवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करतात. पण ते अशी चूक करतात की त्यांचा नंतर डबल खर्च होतो.
advertisement
1/9

मुंबई : उन्हाळा सुरू होतो तेव्हा फ्रिजची खरी किंमत कळते. कारण गारेगार पाणी पिण्यासाठी, ज्यूस ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्यात अन्नपदार्थ ठेवण्यासाठी फ्रीज खुपच उपयोगी पडतो. काही लोक उन्हाळा येताच नवा फ्रीज खरेदी करण्याची प्लॅनिंग करतात. पण हे करत असताना लोक कंफ्यूज होता की, डबल डोअर फ्रिज घ्यावं, सिंगल डोअर घ्याव की मग Side-by-Side Refrigerator फ्रिज घ्यावं.
advertisement
2/9
अनेक लोकांना तर माहितीच नसते. ज्यामुळे ते जे आवडेल ते फ्रिज घेतात. पण कुटुंबाला ते उपयोगी आहे का? याचा विचारच करत नाही. तुम्हीही नवा फ्रिज खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर फॅमिली साइज, कॅपेसिटी, इन्व्हर्टर कंप्रेसर आणि वीज खर्चसारख्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
3/9
फॅमिली साइज पाहून घ्या फ्रिज : फ्रिज खरेदी करताना आधी तुमच्या कुटुंबातील लोकांची संख्या लक्षात घ्या. चुकीच्या कॅपेसिटीचा फ्रीज घेतल्याने जागा कमी पडते किंवा मग वीज बिल हे विनाकारण वाढते.सामान्यतः 1 ते 2 लोकांसाठी 180 ते 120 लिटरचं सिंगल डोअर रेफ्रिजरेटर पुरेसं असतं. तसंच 3 ते 4 लोकं असलेल्या कुटुंबासाठी 240 ते 350 लिटरचं Double Door Refrigerator फ्रिज बेस्ट मानलं जातं.
advertisement
4/9
तुमच्या कुटुंबात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकं असतील तर 400 लिटर किंवा त्याहून जास्त कॅपेसिटीचं Side-by-Side Refrigerator जास्त योग्य असतं. घरात जास्त स्टोरेजची गरज असेल किंवा आठवड्याभराच साहित्य एकत्र ठेवत असाल तर मोठ्या कॅपेसिटीचा फ्रिज जास्त उपयोगी ठरतो.
advertisement
5/9
Single Door Refrigerator सर्वात परवडणारं मानलं जातं. लहान कुटुंब किंवा बॅचलर्ससाठी हे योग्य ठरतं. यात फ्रीजर वर असतं आणि वीजही कमी खर्च होते. तर
advertisement
6/9
Double Door Refrigerator मिड-साइज फॅमिलीसाठी सर्वात जास्त खरेदी केलं जाणारं फ्रिज आहे. यात वेगळा फ्रीजर सेक्शन मिळतो आणि फ्रॉस्ट-फ्री टेक्नॉलॉजीही दिली जाते. ज्यामुळे वारंवार बर्फ हटवण्याची गरज पडत नाही.
advertisement
7/9
Side-by-Side Refrigerator मोठे कुटुंब किंवा जास्त स्टोरेजची गरज गरज असणाऱ्यांसाठी हे फ्रिज असते. यात दोन्ही बाजूला दरवाजे असतात. अनेकदा वॉटर डिस्पेंसर, आइस मेकर आणि स्मार्ट फीचर्सही मिळतात.
advertisement
8/9
Inverter Compressor गरजेचे का? : सध्याच्या काळात जास्तीत जास्त नव्या फ्रिजमध्ये इन्व्हर्टर कंप्रेसर दिलं जातं. हे कंप्रेसर गरजे्या हिशोबाने आपली स्पीड कमी-जास्त करते. यामुळे वीज कमी लागते. फ्रिज कमी आवाज करतो आणि कंप्रेसरची लाइफही जास्त होते. तुम्ही दीर्घकाळापर्यंत वापरण्यासाठी फ्रिज घेत असाल तर इन्व्हर्टर कंप्रेसरचा मॉडल निवडा.
advertisement
9/9
वीज किती खर्च होते? : फ्रिज 24 तास चालणारं उपकरण आहे. यामुळे पॉवर कंजप्शनवर लक्ष देणं गरजेचं असतं. 3 Star Refrigerator मध्ये वीज जास्त खर्च होते. तर 4 Star किंवा 5 Star Refrigerator जास्त वीज वाचवण्यात मदत करते. फ्रिज दीर्घकाळासाठी वापरायचा असेल तर 5 स्टार मॉडल घेतल्याने वीज बिल कमी ठेवण्यात मदत मिळते. योग्य माहितीसोबत फ्रिज खरेदी केला तर पैशांचीही बचत होते आणि फ्रिज वर्षानुवर्षे वापरता येतो.