TRENDING:

नॅशनल टीव्हीवर ते चालतं! बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे, Bigg Boss Marathi 6 पाहून भडकली

Last Updated:
Bigg Boss Marathi Megha Dhade : बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता चुरशीच्या लढाईच्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा वेळी पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेची कमेंट चर्चेत आली आहे.
advertisement
1/7
नॅशनल टीव्हीवर ते चालतं! बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे, Bigg Boss Marathi 6 पाहून भडकली
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा शेवट जसजसा जवळ येत आहे, तसतसा घरातील वातावरण अधिकच तापत चाललं आहे. फिनालेमध्ये जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. पण याच चढाओढीत स्पर्धक आपला कंट्रोल गमावतानाही दिसत आहेत.
advertisement
2/7
या आठवड्यात राकेश बापट आणि विशाल कोटियनमध्ये मोठा राडा झाला. नॉमिनेशन टास्कमध्ये राकेशने विशालला वैयक्तिक आयुष्यावर बोलत असल्याचं कारण देत नॉमिनेट केलं. यावरून विशाल भडकला. त्याने राकेश नेहमी आपलं वय काढतो असं म्हणत त्याचा घटस्फोट काढला यावरून राकेशही पेटला आणि दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली.
advertisement
3/7
दरम्यान राकेश आणि विशालच्या या राड्यामुळे घरातील सगळेच घाबरले. शेवटी बिग बॉसने मध्यस्थी करत हा वाद थांबवला. पण याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटत आहेत. बहुतेकांनी राकेश बापटला पाठिंबा देत विशाल कोटियनला ट्रोल केलं आहे.
advertisement
4/7
प्रेक्षक, नेटिझन्स आणि राकेश बापटची फॅमिलीच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेहीने संताप व्यक्त केला आहे.
advertisement
5/7
राकेश आणि विशालच्या राड्याच्या व्हिडीओवर मेघाने कमेंट केली आहे. ती म्हणाली, "विशाल तू तन्वीच्या वयाबद्दल, राकेशच्या वयाबद्दल बोलते ते ओके आणि तुझंच वय पर्सनल आहे मग. ओह कारण तू तुझ्या वयाबाबत खोटं सांगितलंस"
advertisement
6/7
"स्वत: 25 वर्षे लगान मुलीला पटवायला जातो तेही नॅशनल टीव्हीवर, ते चालतं याला", अशी संतप्त प्रतिक्रिया मेघाने दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता विशालचं हे वागणं म्हणजे बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं म्हणत त्याच्याविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. बापट कुटुंबानेही तसं पत्रक जारी केलं आहे. आता विशालविरोधात नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नॅशनल टीव्हीवर ते चालतं! बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे, Bigg Boss Marathi 6 पाहून भडकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल