खरं तर 21 मार्च 2026 ला विरार जवळील वज्रेश्वरी शिरसाड रोडवरील शिरवली गावच्या सीमेवरील एका शेतातील जांभूळाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला होता.या घटनेत महिलेची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप केला होता.त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येचा तपास करणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते. पण पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत पहिल्यांदा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.
advertisement
500 सीसीटीव्ही तपासल्यावर उलगडलं रहस्य
या घटनेचा क्राइम ब्रांच युनिट 3ने तपास करायला सूरूवात केली होती. या तपासासाठी पहिल्यांदा वसई-विरार, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघर पर्यंत बेपत्ता झालेल्या महिलांचे रेकॉर्ड तपासण्यात आले. पण पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.त्यानंतर पोलिसांनी जवळ जवळ 500 सीसीटीव्ही तपासले.या तपासात त्यांना मृतदेहाची ओळख पटली होती. मृत महिलेचे नाव हे प्रिया कुमारी यादव होते, ती मुळची उत्तर प्रदेश आजमगढची होती, पण ती विरारमध्ये नालासोपाऱ्यात तिच्या नवऱ्यासोबत राहायची.
22 वर्षीय प्रिया यादवच 2017ला रोशन यादवसोबत लग्न झालं होतं. या लग्नानंतर प्रिया यादव ही गावीच राहत होती.सुरूवातीला सगळं सुरळीत चाललं होत.पण एके दिवशी अचानक नवरा रोशन यादव नालासोपाराहून युपीला गेला.त्यानंतर त्याने बाईकवरून तिला नालासोपोऱ्याच्या घरी आणलं.प्रियाला घरी आणल्यानंतर रोशन यादवने त्याचा मित्र भानुप्रताप यादवसोबत मिळून हत्येचा कट रचला. त्यानुसार नवरा आणि मित्र या दोघांनी 19 मार्च 2026 ला प्रिया यादवला कोणता तरी बहाणा सांगून शिरवलीच्या निमर्नु्ष्य परिसरात घेऊन गेले. त्यानंतर त्या ठिकाणी तिच्या पहिल्यांदा गळा चिरला मग ओळख पटू नये यासाठी तिच्या चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या केली. पण रोशन यादवने स्वत:च्याच बायकोची हत्या का केली?हा मोठा प्रश्न होता. या घटनेच्या खोलात गेल्यावर घटनेचा उलगडा झाला.
हत्या का केली?
रोशन यादवला त्याच्या बायकोवर संशय होता. तिचं कुणासोबत अफेअर सूरू होत, असं त्याला नेहमी वाटायचं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन यादवला मुलं हवं होतं. पण प्रिया सारखी सारखी अबॉर्शन करायची.तिने तीन वेळा अबॉर्शन केलं होत. त्यामुळे मुलाची आस, बायकोवर संशय आणि नात्यातील दुराव्यामुळे त्याने बायकोच्या हत्येचा कट रचला होता.
या प्रकरणी आता पोलिसांनी नवरा रोशन यादव आणि त्याचा मित्र भानु्प्रताप यादव यांना अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
