वाशी टोल प्लाझाच्या आधी ठाणे खाडीवरून जाणारा वाशी पुल बंद असणार आहे. सध्या एका बाजूनेच दोन्हीही बाजूंची वाहतूक केली जात आहे. सुरू असलेल्या जॉइंट दुरुस्तीच्या कामासाठी पुलाची एक बाजू बंद करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकार्यांनी मिड डे वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील दोन्हीही लेन कामाकरिता बंद करण्यात आल्या आहेत. हे काम सध्या सुरू असून, या दोन्हीही लेन बुधवारपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
तात्पुरत्या बंदमुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जेव्हा या मुख्य मार्गावर वाहतूक जास्त असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर उशीर होण्याची शक्यता आहे. वाहतुक पोलिसांकडून प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की, या मार्गाचा वापर न करत इतरत्र मार्गांवरून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. गैरसोय टाळण्यासाठी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा विचार करावा. सायन- पनवेल महामार्गावरील (नवी मुंबईच्या दिशेने) वाशी टोल प्लाझाच्या आधी असलेल्या वाशी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जॉइंटची दुरुस्ती आणि देखभाल कामे हाती घेण्यात आल्यामुळे ब्रिज बंद करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत वाशी ब्रिज पुन्हा प्रवाशांच्या सोयीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
