TRENDING:

शनी-मंगळची युती वाढवणार अडचणी, 2 एप्रिलपासून 5 राशींची सुरू होणार 'अग्नीपरीक्षा'; सोसावे लागणार हाल

Last Updated:
2 एप्रिल 2026 रोजी ग्रहांच्या स्थितीत मोठे आणि काहीसे चिंताजनक बदल होणार आहेत. ग्रहांचा सेनापती मंगळ कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे 'न्यायदेवता' शनी आधीपासूनच विराजमान आहे.
advertisement
1/7

2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि मंगळ हे परस्पर विरोधी स्वभावाचे ग्रह मानले जातात. शनी शिस्त आणि संयमाचा कारक आहे, तर मंगळ आक्रमकता आणि ऊर्जेचा. या दोन 'क्रूर' ग्रहांची युती 5 राशींच्या जातकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
advertisement
3/7
मेष - कामात अडथळे आणि अपघात भय: मेष राशीचा स्वामी मंगळ असून तो तुमच्या बाराव्या भावात शनीशी युती करेल. या काळात तुमच्या कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात. प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या, कारण अपघाताचा धोका संभवतो. खर्चावर नियंत्रण न राहिल्याने आर्थिक ताण वाढू शकतो.
advertisement
4/7
सिंह - वादविवाद आणि मानसिक तणाव: सिंह राशीच्या अष्टम भावात ही युती होत आहे. यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जवळच्या व्यक्तींशी किंवा जोडीदाराशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल.
advertisement
5/7
कन्या - भागीदारीत नुकसान आणि वैवाहिक कलह: कन्या राशीच्या सातव्या भावात शनी-मंगळ एकत्र येत आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर आणि भागीदारीतील व्यवसायावर होईल. नवीन व्यवसाय सुरू करणे सध्या टाळावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि संवादातील गोडवा टिकवून ठेवा.
advertisement
6/7
कुंभ - आर्थिक फसवणूक आणि कौटुंबिक समस्या: कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरू असून मंगळाचा मीन प्रवेश तुमच्या धन स्थानी परिणाम करेल. कोणालाही उसने पैसे देणे टाळा, अन्यथा ते परत मिळणे कठीण होईल. कुटुंबात मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम पाळणे हिताचे ठरेल.
advertisement
7/7
मीन - आरोग्याच्या तक्रारी आणि साडेसातीचा प्रभाव: तुमच्याच राशीत ही युती होत असल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक व्याधी सतावू शकतात. साडेसातीचा मधला टप्पा असल्याने कामाचा भार वाढेल आणि केलेल्या मेहनतीचे फळ विलंबाने मिळेल. रक्ताशी संबंधित किंवा संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शनी-मंगळची युती वाढवणार अडचणी, 2 एप्रिलपासून 5 राशींची सुरू होणार 'अग्नीपरीक्षा'; सोसावे लागणार हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल