Mumbai To Kolhapur Flight : अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात 75 मिनिटांत जाता येणार; मुंबईतून दोन वेळा विमानसेवा, पाहा टाइमटेबल
Last Updated:
Mumbai To Kolhapur Flight : नवी मुंबईहून आता कोल्हापूरला जाण्यासाठी विमानसेवा ही दिवसातून दोन वेळा सुरु झाली असून मात्र यासाठी प्रवाशांना कोणत्या वेळेत विमानतळावर जावे लागणार आहे, त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक सध्या समोर आलेले आहे.
advertisement
1/8

येत्या काही दिवसांत जर तुमचा ही सुट्टीसाठी कोल्हापुरात जाण्याचा विचार आहे तर आता हा प्रवास अतिशय कमी वेळात आणि अधिक सोयीस्कर करता येणार आहे.
advertisement
2/8
कारण आता कोल्हापूर-नवी मुंबई- कोल्हापूर असे दिवसांतून दोन वेळा विमानसेवा सुरु झालेली आहे. जी इंडिगो एअरलाईन्स मार्फत आहे. पहिल्या दिवशी साधारण 67 प्रवासी कोल्हापुरात आले तर मुंबईला 65 प्रवासी आले.
advertisement
3/8
जर तुम्हीही या पुढे कोल्हापूरातून मुंबईला येण्याचा विचार करताय किंवा मुंबईतून कोल्हापूरला जाण्याचा विचार करताय तर या विमानसेवेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
advertisement
4/8
इंडिगो एअरलाईन्सचे पहिले विमान हे दररोज सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेईल आणि काही तासांत अर्थात 9 वाजून 15 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल.
advertisement
5/8
पुन्हा 20 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर तेच विमान 9 वाजून 35 मिनिटांनी कोल्हापूरहून उड्डाण घेऊन 10 वाजून 25 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर परत येईल.
advertisement
6/8
सकाळी नाही तर संध्याकाळच्या वेळेतही प्रवाशांसाठी ही सेवा सुरु राहणार आहे. ज्यात सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेतलेले विमान ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल.
advertisement
7/8
कोल्हापूर विमानतळावर 20 मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर पुन्हा रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी विमान पुन्हा कोल्हापूरहून उड्डाण घेईल आणि नवी मुंबईत 10 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.
advertisement
8/8
कोल्हापूर-नवी मुंबई विमानसेवेचा फायदा व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai To Kolhapur Flight : अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात 75 मिनिटांत जाता येणार; मुंबईतून दोन वेळा विमानसेवा, पाहा टाइमटेबल