पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३-४ किमीचा 'जॅम'
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवासाचे नियोजन करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आडोशी बोगदा ते मिसिंग लिंक (खालापूर एंड) पर्यंत वाहनांच्या तब्बल ३ ते ४ किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. या कोंडीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. घाट विभागात वाहनांची संख्या वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
advertisement
मुंबई-अहमदाबाद हायवेवर ७ किमीचा 'महाथरार'
दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मनोर येथील हालोली ते वरई दरम्यान ६ ते ७ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर पहाटेपासूनच ही कोंडी झाल्याने प्रवासी ३ ते ४ तासांपासून अडकले आहेत. येथील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने आणि वाहनांचा ओघ वाढल्याने प्रवाशांना या प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
जर तुम्ही या मार्गांवरून प्रवास करणार असाल, तर पर्यायी मार्गांचा विचार करावा किंवा प्रवासाचे नियोजन काही काळ पुढे ढकलण्याबाबत विचार करा. सोबत पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवा.
