TRENDING:

प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह, ‎5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ, छ. संभाजीनगर घटना

Last Updated:

प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत सातत्याने छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह केलेल्या 21 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत सातत्याने छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करून अखेर तिला घराबाहेर काढण्यात आल्याची तक्रारही समोर आली आहे. ही घटना 20 डिसेंबर 2023 ते 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत जवाहर कॉलनी परिसरात घडली.
‎पाच लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; आंतरजातीय विवाहानंतर सासरकडून अत्याचार
‎पाच लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; आंतरजातीय विवाहानंतर सासरकडून अत्याचार
advertisement

या प्रकरणी पती यश रामलिंग हुंडीवाले, सासू शैला संतोष जावळे, सावत्र सासरे संतोष जावळे आणि दीर अभि रामलिंग हुंडीवाले (सर्व रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) यांच्याविरोधात 29 मार्च रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विवाहितेने फिर्याद दिली आहे.

‎फिर्यादीत नमूद केल्यानुसार, डिसेंबर 2023 मध्ये प्रेमसंबंधातून संबंधित तरुणीसोबत न्यायालयात आंतरजातीय पद्धतीने विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस परिस्थिती सुरळीत होती, मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी हा विवाह मान्य नसल्याचे सांगत तिच्याशी वर्तन बदलले. आमचे रीतिरिवाज तुला कळत नाहीत असे म्हणत तिला वारंवार जातीवाचक शब्दांनी अपमानित करण्यात येत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

‎तसेच पती हा दारूच्या नशेत घरी येऊन किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप आहे. अनेक वेळा रात्री उशिरा पीडितेला घराबाहेर काढण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासूनच पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास तिला घराबाहेर हाकलून लावण्यात आले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक आयुक्त मनीष कल्याणकर करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह, ‎5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ, छ. संभाजीनगर घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल