TRENDING:

KKR vs MI : रिंकुकडे कॅप्टन्सी आली अन् मुंबईने मॅच फिरवली, 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर घोडचूक!

Last Updated:

kolkata knight riders vs mumbai indians match : पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स खाल्यानंतर कार्तिक त्यागीवर पुन्हा रिंकूने विश्वास दाखवला. रिंकूने त्याला 10 वी ओव्हर सोपवली. तोपर्यंत मुंबई इंडियन्सने 9 ओव्हरमध्ये 110 धावा केल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
kolkata knight riders vs mumbai indians match : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या हंगामाचा दुसरा सामना खेळवला गेला. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात पलटणने बाजी मारली आहे. रोहित शर्मा आणि रायन रिक्लटन यांच्या शतकीय भागेदारीमुळे मुंबईला विजय मिळवणं सोपं झालं. अशातच आता 10 व्या ओव्हरमध्ये केकेआरकडून झालेली एक चूक महागात पडली अन् त्यांना सामना हातातून गमावावा लागला.
KKR vs MI Rinku Singh Angry On Vaibhav arora over drop catch
KKR vs MI Rinku Singh Angry On Vaibhav arora over drop catch
advertisement

रिंकु सिंगच्या खांद्यावर कॅप्टन्सी

मॅचमध्ये रोहित शर्मा आणि रायन रिक्लटन यांनी मॅच केकेआरपासून खेचून घेण्याचा प्रयत्न केला दोन्ही खेळाडूंनी पावरप्लेमध्ये 80 धावा कुटल्या. त्यानतंर केकेआरला कमबॅक करायचं होतं. पण त्याचवेळी केकेआरला मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे मैदानाबाहेर गेला. अजिंक्य रहाणे याने जाताजाता रिंकु सिंग याच्या खांद्यावर कॅप्टन्सी सोपवली अन् रहाणे बाजूला गेला. रिंकुने मॅनेजमेंटच्या मदतीने बॉलर्स रोटेट केले पण विकेट काही मिळत नव्हती.

advertisement

MI vs KKR : 25 कोटींच्या कॅमरून ग्रीनला बॉलिंग का दिली नाही? कॅप्टन अजिंक्यने एका वाक्यात विषय संपवला! कुणावर फोडलं खापर?

10 ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर काय घडलं?

पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स खाल्यानंतर कार्तिक त्यागीवर पुन्हा रिंकूने विश्वास दाखवला. रिंकूने त्याला 10 वी ओव्हर सोपवली. तोपर्यंत मुंबई इंडियन्सने 9 ओव्हरमध्ये 110 धावा केल्या होत्या. कोलकाताच्या हातातून मॅच निसटत होती. त्याचवेळी 10 ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर एक संधी चालून आली. रिकलटनने त्यागीच्या शॉट बॉलवर स्विव्हल करत पूल शॉट मारला होता, जो थेट बाउंड्री लाईनच्या जवळ उभ्या असलेल्या वैभव अरोराच्या हातात गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने धावत आलेल्या वैभवने कॅच घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला कॅच घेता आला नाही. केकेआरसाठी ही विकेट अत्यंत महत्त्वाची होती पण चूक झाली.

advertisement

पलटणने सामना फिरवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

रिक्लटन सेट झालेला बॅट्समन होता आणि तो आक्रमक फटकेबाजी करत होता. कार्तिक त्यागीने आपल्या बॉलिंगने मुंबईच्या बॅट्समनना अडचणीत आणले होते, पण फिल्डरची साथ न मिळाल्याने त्याला विकेट मिळवता आली नाही. यानंतर कॅप्टन रिंकु सिंग चांगलाच भडकला. जर हा कॅच झाला असता तर मुंबई इंडियन्सवर प्रेशर तयार करता आलं असतं. मुंबई इंडियन्सने यानंतर तीन विकेट्स गमावले होते. त्यामुळे एका कॅचने मुंबईला सामन्यात जिवंत ठेवलं अन् पलटणने सामना फिरवला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs MI : रिंकुकडे कॅप्टन्सी आली अन् मुंबईने मॅच फिरवली, 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर घोडचूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल