Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील डेूब्यूला दिग्गजाचा विरोध, म्हणतो,'तो अजून खूप लहान आहे,तुम्ही...'
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव सूर्यवंशीची ही फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक मोठं विधान केलं होतं. वैभव सूर्यवंशीला व्हाईट बॉल टीममध्ये घेण्याबाबत विचार झाला पाहिजे, असे मायकल वॉन म्हणाला आहे.
advertisement
1/7

आयपीएलमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्सने 8 विकेट आणि 47 बॉल राखून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार हा वैभव सूर्यवंशी ठरला होता. कारण वैभव सूर्यवंशीने 17 बॉलमध्ये 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
2/7
वैभव सूर्यवंशीची ही फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक मोठं विधान केलं होतं. वैभव सूर्यवंशीला व्हाईट बॉल टीममध्ये घेण्याबाबत विचार झाला पाहिजे, असे मायकल वॉन म्हणाला आहे.
advertisement
3/7
मी थोडा पुढचा विचार करतो आहे आणि मला वाटतं मी खूप लवकर निष्कर्ष काढतो आहे.कारण वैभवची ही आयपीएलमधली पहिलीच इनिंग आहे.पण काही महिन्यांनी इंग्लंडचा व्हाईट बॉलचा दौरा येणार आहे. जर मी भारतीय क्रिकेटच्या निवड समीतीत असता तर मी वैभवला नक्कीच त्या दौऱ्यावर नेलं असतं, असे मायकल वॉन म्हणाला आहे.
advertisement
4/7
मी हे नाही सांगत आहे की तुम्ही त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्या. कारण टीममध्ये आधीच खूप खेळाडू आहेत. पण भारतीय टीममध्ये त्याला आणण आणि त्या टीमचं वातावरण तयार करणं गरजेचे आहे. जर त्याला एक दोन सामने खेळायची संधी दिली तरी खूप झालं. पण सर्वात मोठी गोष्ट आहे त्याला दौऱ्यावर न्या,असे मायकल वॉनने सुचवलं आहे.
advertisement
5/7
मायकल वॉनच्या याच विधानाला जोडून टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनने मोठं विधान केलं आहे. वैभवला त्याचा वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकून घाईघाई केली नाही पाहिजे, असे अश्विन म्हणाला आहे.
advertisement
6/7
वैभवला तुम्ही लक्ष्य नका देऊ. तो मोठा खेळाडू नाही आहे, तो एक मुलगा आहे. जर एमएस धोनी 45 वर्षांपर्यंत खेळू शकतो तर सूर्यवंशी 40 वर्षापर्यंत खेळू शकतो.त्यामुळे त्याच्याकडे अडीज दशके शिल्लक आहेत. त्यामुळे त्याला एकट सोडा, तो वेळ आल्यावर टीम इंडियात येईल.
advertisement
7/7
वैभव सूर्यवंशी इतका चांगला खेळाडू आहे की भारताकडून खेळण्यापासून राहूच शकत नाही.तो एक दिवस नक्कीच खेळेल.पण तो कधी खेळेल, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.आपण नेहमी इतक्या घाईत का असतो? असा शेवटी सवाल देखील आर.अश्विनने उपस्थित केला आहे.एकूणच वैभव सूर्य वंशीच्या टीम इंडियातील डेब्यूला संध्यातरी अश्विनने विरोध केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील डेूब्यूला दिग्गजाचा विरोध, म्हणतो,'तो अजून खूप लहान आहे,तुम्ही...'