TRENDING:

बिग बॉसने आई-आज्यांना बिघडवून ठेवलंय! मराठी अभिनेत्री वैतागली, थेट VIDEO च दाखवला

Last Updated:

'बिग बॉसने सगळ्या आई आणि आज्यांना बिघडवून ठेवलंय', असं म्हणत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व्हिडीओ शेअर केला आहे. ती असं का म्हणाली?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा सुरू आहे. प्रत्येक घरात बिग बॉस पाहिलं जातंय. सगळीकडे बिग बॉसवर गॉसिप ऐकायला मिळलंय. मंडळी घरातील कामाला बाजूला ठेवून बिग बॉस पाहाताना दिसत आहेत. असं सगळं सुरू असताना प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बिग बॉसमुळे घराबाहेर राहाण्याची वेळ आली. नेमकं काय झालं?
News18
News18
advertisement

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री अक्षया नाईकने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती कामावरून घरी पोहोचली. घराची बेल वाजवली पण बेल वाजवूनही घरातून कोणीही दार उघडत नाही. अक्षया बाहेरून आई-आई ओरडताना दिसतेय. पण घरातून कोणी बाहेर येत नाहीये.

( आम्हाला न्याय द्या! RB च्या फॅमिलीने जोडले हात; Bigg Boss Marathi 6 च्या घरात राकेशशी राडा विशालला भोवणार )

advertisement

अक्षयाने कंटाळून घराच्या खिडकीजवळ गेली. खिडकीतून पाहिलं तेव्हा तिची आई आणि आजी बिग बॉस पाहण्यासाठी दंग होत्या. त्या इतक्या दंग होत्या की अक्षयाने केलेले फोन आणि दाराची बेलही त्यांना ऐकू आली नाही. अक्षयाने हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला आणि थेट बिग बॉसच्या लोकांना टॅग केला.

आई,बेल आणि बिग बॉस असं म्हणत अक्षयाने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिनं बिग बॉसचे कास्टिंग डायरेक्टर केतन माणगांवकर आणि प्रथमेश देसाई यांना टॅग करत लिहिलंय, बिघडवून ठेवलं आज कालच्या आई आज्यांना तुम्ही. फक्त दिवसभर टीव्हीवर बिग बॉस बघतात, नाहीतर बिग बॉसच्या कंटेस्टंटबद्दल डिस्कस करत असतात.

advertisement

[video width="720" height="1280" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/AQNrtOlkUk2E9b0lgHhj9erMsorx1sOy5oJWFEvPH1nZ1ILxN_sAN1_VarjQq-LILuJx-Gtx5_qVYeCyZJ2SHCo-VG91D6mcSUudLvM-2026-03-25315baf8190e136367dfec020588655.mp4"][/video]

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

अभिनेत्री अक्षया नाईक नुकत्यात आलेल्या 'तस्करी' या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्या दमदार भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अभिनेता इमरान हाशमीबरोबर तिनं स्क्रिन शेअर केली आहे.  'सुंदरा मनामध्ये भरली' या मराठी मालिकेतून अक्षया घराघरात पोहोचली. त्याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/मनोरंजन/
बिग बॉसने आई-आज्यांना बिघडवून ठेवलंय! मराठी अभिनेत्री वैतागली, थेट VIDEO च दाखवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल