IPL इतिहासात पहिल्यांदाच... बापाविरुद्ध मुलगा मैदानात उतरणार, पिता-पूत्राच्या लढाईत टीमचं सर्वस्व पणाला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमात चाहत्यांना ऐतिहासिक सामना पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच बापाच्या टीमचा सामना हा मुलाविरुद्ध होणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
1/9

आयपीएलचा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू झाला आहे. आतापर्यंतच्या 18 मोसमांमध्ये आयपीएलमध्ये अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाले, तसंच टी-20 क्रिकेटमधले अनेक विक्रमही तुटले.
advertisement
2/9
आयपीएल 2029 मध्ये अशी एक मॅच होणार आहे ज्यात बाप आणि मुलाची टीम आमने-सामने येणार आहेत. आयपीएलच्या 19 मोसमांच्या इतिहासात पहिल्यांदाच बाप आणि मुलाची टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे.
advertisement
3/9
आयपीएल 2026 चं टाईम टेबल दोन टप्प्यांमध्ये जाहीर केलं गेलं. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे आयपीएलने आधी पहिल्या टप्प्याचं आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं.
advertisement
4/9
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर होताच स्पर्धेमध्ये बाप आणि मुलाच्या टीमचा सामना कधी होणार? हेदेखील स्पष्ट झालं आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 मे रोजी हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.
advertisement
5/9
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता आयपीएलच्या बाप आणि मुलाच्या टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. पिता-पूत्राच्या या ऐतिहासिक सामन्यामध्ये कुणाचा विजय होणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
advertisement
6/9
सोमवार 4 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजाएंट्स यांच्यात सामना होईल. या सामन्यात वडील आणि मुलाची टीम एकमेकांविरुद्ध लढतील.
advertisement
7/9
आयपीएल 2026 च्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजाएंट्स यांच्यासोबत ट्रेड डील केलं ज्यात त्यांनी अर्जुन तेंडुलकरला लखनऊला दिलं, त्यामुळे अर्जुन या मोसमात लखनऊ सुपरजाएंट्सकडून मैदानात उतरेल.
advertisement
8/9
डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या अर्जुन तेंडुलकरचा सामना त्याचेच वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होईल. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मेंटर आहे, तसंच तो मुंबईच्या प्रत्येक सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असतो.
advertisement
9/9
लखनऊ सुपरजाएंट्सविरुद्धच्या सामन्यात सचिन मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये असेल, तर त्याचा मुलगा अर्जुन हा लखनऊच्या टीममध्ये असेल. या सामन्यात लखनऊने अर्जुनला खेळण्याची संधी दिली तर खुद्द सचिन आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा वेगळाच अनुभव असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL इतिहासात पहिल्यांदाच... बापाविरुद्ध मुलगा मैदानात उतरणार, पिता-पूत्राच्या लढाईत टीमचं सर्वस्व पणाला!