पापणी लवते न लवते तोच बदलते स्टोरी! 6 फिल्ममध्ये जबरदस्त ट्विस्ट; शेवटची सगळ्यांचा 'बाप'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Suspense Thriller Movie : तुम्हाला सस्पेन्स आणि थ्रीलर पाहायला आवडत असेल तर या 8 फिल्म्स तुमच्यासाठी. ज्यांच्या स्टोरीत क्षणाक्षणाला असे ट्विस्ट येतात की पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही शेवटपर्यंत लावू शकत नाही.
advertisement
1/7

सस्पेन्स आणि थ्रीलरची जादू अशी असते की प्रेक्षक अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत पडद्याला खिळून राहतात. फिल्ममध्ये ट्विस्ट येतात तेव्हाच खरी मजा येते. तुम्हालाही अशा फिल्म्स आवडत असतील तर अशा 8 फिल्म्सची यादी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
2/7
द सिक्स्थ सेन्स : एक मुलगा ज्याला मृत व्यक्ती दिसतात. डॉक्टर त्याला बरं करण्यासाठी प्रयत्न करतात. संपूर्ण फिल्म पाहताना तुम्हाला जे वाटतं ते क्लायमॅक्समध्ये पूर्णपणे खोटं ठरतं. फिल्म संपल्यानंतर त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी ती पुन्हा पाहण्याची इच्छा होते.
advertisement
3/7
द प्रेस्टीज: ख्रिस्तोफर नोलनचा ही फिल्म दोन जादूगारांमधील स्पर्धेभोवती फिरतो. ही फिल्म म्हणजे स्वत:च एक जादू आहे, जी तुम्ही जितकी काळजीपूर्वक पाहता तितकेच तुम्ही फसता. त्याचा शेवट इतका खोल आहे की एखादी व्यक्ती आपल्या कलेसाठी कोणत्या थराला जाऊ शकते यावर विचार करायला तुम्हाला भाग पाडेल.
advertisement
4/7
अंधाधून: आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाने थ्रीलरचा अर्थच बदलून टाकला. एक अंध पियानोवादक जो कदाचित अंध असेल किंवा नसेल, एका खुनाचा साक्षीदार होतो. चित्रपटातील अनपेक्षित वळणांमुळे, कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे, याबद्दल तुमचा गोंधळ उडतो. त्याचा शेवटचा सीन आजही इंटरनेटवर चर्चेचा विषय आहे.
advertisement
5/7
कहाणी : विद्या बालनची ही फिल्म, प्रेग्नंट महिला जी कोलकात्याच्या रस्त्यांवर ती आपल्या बेपत्ता नवऱ्याचा शोध घेत असते. संपूर्ण चित्रपटात तुम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण क्लायमॅक्समध्ये जेव्हा देवी दुर्गाच्या विसर्जनादरम्यान सत्य उघड होतं, तेव्हा सर्वजण थक्क होतात. हा भारतीय सिनेमातील सर्वोत्तम ट्विस्टपैकी एक आहे.
advertisement
6/7
तुम्बाड: हस्तरच्या खजिन्याची आणि मानवी लोभाची ही कथा एखाद्या लोककथेसारखी वाटते. पण तुम्ही यापूर्वी भय आणि रहस्याचं असं मिश्रण कधीही पाहिलं नसेल. चित्रपटाचे वातावरण आणि छायाचित्रण दोन्ही भीतीदायक आणि चित्तवेधक आहेत. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लपलेलं रत्न आहे.
advertisement
7/7
शटर आयलंड: लिओनार्डो डिकॅप्रियोची फिल्म म्हणजे एक मानसिक भुलभुलैया आहे. दोन गुप्तहेर एका बेपत्ता रुग्णाला शोधण्यासाठी एका बेटावर जातात, जिथं एक मनोरुग्णालय आहे. जसजसा तपास पुढे जातो तसतशी वास्तव आणि कल्पनेमधील रेषा धूसर होऊ लागते. जेव्हा अंतिम सत्य उघड होतं, तेव्हा तुम्ही थक्क होऊन जाता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पापणी लवते न लवते तोच बदलते स्टोरी! 6 फिल्ममध्ये जबरदस्त ट्विस्ट; शेवटची सगळ्यांचा 'बाप'