TRENDING:

खरातच्या 4 फोनचं 'विचित्र' गुपित उघड; महिलांसाठी वापरायचा खास नंबर; राजकीय नेत्यांसाठी हाय-फाय नेटवर्क

Last Updated:

महिलांचे शोषण करणारा हा भोंदू किती नियोजनबद्ध रीतीने आपले साम्राज्य चालवत होता, हे पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक:  नाशिकमध्ये फसवणुकीचे केंद्र ठरलेला 'भोंदू' अशोक खरात याच्या पापकर्मांचा कच्चा चिट्ठा आता एसआयटीच्या (SIT) चौकशीत उघड होऊ लागला आहे. गेल्या पाच तासांपासून सुरू असलेल्य चौकशीत खरातच्या हायप्रोफाईल कार्यशैलीचा आणि त्याने विणलेल्या जाळ्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण, अर्थकारण आणि महिलांचे शोषण करणारा हा भोंदू किती नियोजनबद्ध रीतीने आपले साम्राज्य चालवत होता, हे पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.
News18
News18
advertisement

आध्यात्मिक गुरूचा बुरखा पांघरून भोळ्याभाबड्या जनतेला लुटणाऱ्या अशोक खरात याच्याभोवती आता एसआयटीचा फास आवळला गेला आहे. मंगळवारी झालेल्या चौकशीत खरात चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हे चारही क्रमांक त्याने वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी घेतल्याचे समोर आले आहे.

कसे होते खरातचे मोबाईल  जाळे?

    advertisement

  1. राजकीय नेत्यांसाठी खास नंबर: खरातचा एक क्रमांक केवळ बड्या राजकीय नेत्यांशी संवाद साधण्यासाठी होता. सत्तेच्या वर्तुळात आपली पकड मजबूत करण्यासाठी तो या क्रमांकाचा वापर करत असे.
  2. महिला आणि बड्या भक्तांसाठी दुसरा नंबर: सूत्रांच्या माहितीनुसार श्रीमंत भक्त आणि महिलांशी संपर्क साधण्यासाठी त्याने दुसरा स्वतंत्र क्रमांक ठेवला होता. याच क्रमांकावरून अनेक अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
  3. advertisement

  4. आर्थिक व्यवहारांचे गणित: तिसऱ्या क्रमांकाचा वापर केवळ पैशांच्या देवाणघेवाणीसाठी आणि आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी केला जात होता.
  5. सर्वसामान्यांसाठी चौथा नंबर: सामान्य भक्त आणि लोकांसाठी त्याने चौथा क्रमांक सार्वजनिक केला होता, ज्यावरून तो आपली लोकप्रियता टिकवून ठेवत होता

फॉरेन्सिक तपासात मोठे मासे गळाला लागणार?

खरातने यापूर्वी अनेकदा तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता फॉरेन्सिक टीमने हे चारही मोबाईल ताब्यात घेतले असून त्यातील डिलीट केलेला डेटा, चॅट्स आणि ऑडिओ क्लिप्स रिकव्हर करण्याचे काम सुरू केले आहे. या डेटा मधून अनेक राजकीय नेते आणि बड्या हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धर्माच्या नावाखाली चालणारा हा गोरखधंदा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला असून नाशिककर आता या भोंदूला कठोर शिक्षा होण्याची वाट पाहत आहेत. चौकशीत आणखी काय खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर सुद्धा फेल, बनवला असा टेबल की 12 प्रकारे येईल वापरता! वर्षाला 50 लाखांचा बिझनेस!
सर्व पहा

Ashok Kharat: अशोक खरातची पाठराखण करणारी बायको आता अडचणीत, शिर्डीतील प्रकरणात अटक होण्याची शक्यता

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातच्या 4 फोनचं 'विचित्र' गुपित उघड; महिलांसाठी वापरायचा खास नंबर; राजकीय नेत्यांसाठी हाय-फाय नेटवर्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल