TRENDING:

Weather Alert : विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
30 मार्च रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
1/7
विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रावर मार्चअखेर मोठे अस्मानी संकट घोंघावत आहे. 30 मार्च रोजी विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
2/7
राज्यातील 15 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विभागानुसार राज्यातील हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
3/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. मुंबईत कमाल तापमान 31 अंश ते किमान तापमान 26 अंश सेल्शिअस राहील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
4/7
30 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात 30 मार्च रोजी अवकाळी पाऊस कोसळेल. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विजांचा धोका अधिक राहणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 39 अंश ते किमान तापमान 26 अंश सेल्शिअस राहील.
advertisement
7/7
दरम्यान, महाराष्ट्रात 30 मार्च रोजी अवकाळी संकटाचा धोका वाढला आहे. नागरिकांनी विजा आणि जोरदार वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, महाराष्ट्रावर अस्मानी संकट, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल