TRENDING:

Health Tips: उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधलं थंड पाणी पिऊ नका! गार वाटेल पण शरिरावर होतात असे परिणाम

Last Updated:
उष्णतेमुळे शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते आणि शरीराला पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे माठातील पाणी पिले जाते. तसेच नॉर्मल पाणी पिले जाते, परंतु काहीजण हे फ्रिजमधील थंड पाणी पितात आणि याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात.
advertisement
1/5
उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधलं थंड पाणी पिऊ नका! गार वाटेल पण शरिरावर होतात असे परिणाम
सध्या उन्हाचा कडाका वाढलेला दिसतोय. त्यामुळे तहान भागवण्यासाठी आपण थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स घेतो. बऱ्याच वेळी आपण ऑफिस किंवा इतर ठिकाणावरून घरी आलो की फ्रिजमधील थंड पाणी पितो. परंतु तुम्हाला माहितीये का फ्रिजमधील पाणी प्यायल्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम काय होतात? तर नेमके काय दुष्परिणाम दिसून येतात आणि यावर काय काळजी घेतली पाहिजे? याविषयीची माहिती पुण्यातील डॉक्टर सचिन पवार यांनी दिली आहे.
advertisement
2/5
उष्णतेमुळे शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते आणि शरीराला पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे माठातील पाणी पिले जाते. तसेच नॉर्मल पाणी पिले जाते, परंतु काहीजण हे फ्रिजमधील थंड पाणी पितात आणि याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. यामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात. पचन संस्था मंदावते, डोकेदुखी, पोटाचा त्रास होऊ शकतो. तसेच वजन वाढीची समस्याही निर्माण होऊ शकते.
advertisement
3/5
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे कफ तयार होतो. त्यामुळे घसा खवखव करू शकतो. पचन संस्था मंदावते यामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमी होते. थंड पाण्यामुळे हृदयाचे ठोके हे मंदावतात.
advertisement
4/5
त्यामुळे मेटाबॉलिजम बिघडू शकते म्हणजे वजन कमी करत असाल तेव्हा त्रास जाणवू शकतो. थंड पाणी प्यायल्याने मेंदू गोठू शकतो. थंड पाणी मणक्याच्या संवेदनशील नसांना थंड करतो, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. त्यामुळे शक्यतो नॉर्मल पाणी प्यावं, असा सल्ला डॉक्टर सचिन पवार यांनी दिला आहे.
advertisement
5/5
बऱ्याच वेळी थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. त्यामुळे शरीरावर अनेक साइड इफेक्ट्स झालेले दिसून येतात. म्हणजे थंड पाण्यामुळे तात्पुरती तहान जरी भागत असली तरी ते शरीरासाठी घातक असं आहे. त्यामुळे शक्यतो फ्रिजमधील अतिशय थंड पाणी पिणं टाळावं. माठ किंवा साधं पाणी प्यावं, असंही डॉक्टर सचिन पवार सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधलं थंड पाणी पिऊ नका! गार वाटेल पण शरिरावर होतात असे परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल