TRENDING:

रुपाली चाकणकर भोंदू खरातच्या एजंट, महिलांना पाठवायच्या 'बाबा' कडे; रुपाली ठोंबरेंच्या दाव्याने खळबळ

Last Updated:

रूपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नाही, तर भोंदू अशोक खरातच्या 'एजंट' म्हणून काम करत होत्या, असा खळबळजनक आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन महिला नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केलेले आरोप केवळ धक्कादायक नाहीत, तर ते संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडणारे आहेत.
News18
News18
advertisement

राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत स्फोटक वळण आले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नाही, तर भोंदू अशोक खरातच्या 'एजंट' म्हणून काम करत होत्या, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

advertisement

रुपाली चाकणकर काय सल्ला  देत होत्या? 

रूपाली ठोंबरे यांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्या पीडित महिला कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वादाच्या तक्रारी घेऊन महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी येत होत्या, त्यांचे योग्य समुपदेशन करणे आयोगाचे कर्तव्य होते. मात्र, रूपाली चाकणकर या महिलांना दिलासा देण्याऐवजी तुम्ही अशोक खरात बाबाकडे जा, तुमचे प्रश्न सुटतील, असा अजब सल्ला देत होत्या. न्यायाच्या आशेने आलेल्या महिलांना जाणीवपूर्वक भोंदू बाबाच्या जाळ्यात ढकलण्याचे पाप आयोगाच्या खुर्चीवर बसून झाले आहे, असे गंभीर आरोप ठोंबरे यांनी केले आहे.

advertisement

रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा, रुपाली ठोंबरेंची मागणी

अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जर यातील काही महिलांना आयोगाकडून तिकडे पाठवण्यात आले असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. रूपाली चाकणकर या खरातच्या काळ्या कृत्यांमध्ये सामील आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी ठोंबरे यांनी लावून धरली आहे.

advertisement

कॅप्टन खरात प्रकरणाला नवे वळण

याआधीही रूपाली चाकणकर यांचे खरातशी असलेले संबंध आणि एका ट्रस्टवरील त्यांचे सदस्यत्व चर्चेत आले होते. मात्र, आता थेट आयोगाकडे येणाऱ्या पीडितांना बाबाकडे पाठवण्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या आरोपांवर आता स्वतः चाकणकर काय भूमिका घेतात  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाण्यातून कमावला पैसा! संतोषने आईस गोळाचा ब्रँडच उभारला, दिवसाला 25 हजार कमाई!
सर्व पहा

'मी शंकर तू पार्वती' म्हणत महिलेवर अत्याचार करणारा भोंदू ऋषिकेश फरार, सोशल मीडियावर पोस्ट करत झाला अंडरग्राऊंड

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रुपाली चाकणकर भोंदू खरातच्या एजंट, महिलांना पाठवायच्या 'बाबा' कडे; रुपाली ठोंबरेंच्या दाव्याने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल