TRENDING:

Dombivli News: शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला केले नको ते मेसेजेस, डोंबिवलीतील संतापजनक घटना

Last Updated:

डोंबिवलीतल्या सागाव परिसरातील एका प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शाळेतल्या शिक्षिकेवर विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली: डोंबिवलमध्ये एका शाळेमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे कल्याण- डोंबिवली शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. डोंबिवलीतल्या सागाव परिसरातील एका प्रसिद्ध शाळेमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. डोंबिवलीतील एका प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शाळेतल्या शिक्षिकेवर विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ट्रस्टीच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे डोंबिवली शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
News18
News18
advertisement

हा संपूर्ण प्रकार डोंबिवलीतल्या जय भारत हायस्कूलमध्ये घडलेला आहे. शिक्षिकेवर विनयभंग केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सरवणा अय्यर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रस्टीचा मुलगा शाळेतल्या शिक्षिकेला गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेजेस, फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवत होता. शिक्षिकेने ट्रस्टीच्या मुलावर अश्लील मेसेजेस, फोटोज् आणि व्हिडिओज् पाठवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोपही केला. या घटनेमुळे शिक्षिका अनेक दिवस चिंतेत होत्या. त्यामुळे त्यांनी घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

advertisement

शिक्षिकेने आणि त्यांच्या आईने थेट मनसेसोबत संपर्क साधून घडलेले संपूर्ण प्रकरण कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्याजवळ न्यायाची मागणी केली. शिक्षिकेसोबत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती कळताच गुरूवारी (26 मार्च) दुपारी, मनसेचे पदाधिकारी राहुल कामत, अरुण जांभळे आणि महिला पदाधिकारी कोमल पाटील यांच्या नेतृत्वाखाली "आरोपीला आमच्या ताब्यात द्या...", अशा घोषणा आणि मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या आवारात एकत्र येऊन शाळेच्या ट्रस्टीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेचच संपूर्ण घटना शांत केली.

advertisement

पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मनसे पदाधिकार्‍यांना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी ट्रस्टी शिवा अय्यर यांच्याकडे त्यांच्या मुलाबद्दल विचारले असता, तो घरी असल्याचे त्यांना कळाले. शाळेच्या ट्रस्टीने पोलिसांना सहकार्य करत आपल्या मुलाला घराबाहेर काढले. पोलिसांनी आरोपी सरवना अय्यर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. “जर माझा मुलगा दोषी आढळला, तर त्याला कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे.” अशी मागणी शाळेच्या ट्रस्टीने पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाण्यातून कमावला पैसा! संतोषने आईस गोळाचा ब्रँडच उभारला, दिवसाला 25 हजार कमाई!
सर्व पहा

पीडितेचा सविस्तर जबाब पोलिसांकडून नोंदवून घेतला जात आहे. भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलमांनुसार पाठलाग करणे, लैंगिक छळ आणि अश्लील मेसेजेस पाठवणे या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Dombivli News: शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला केले नको ते मेसेजेस, डोंबिवलीतील संतापजनक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल