TRENDING:

Satara ZP Eleciton : आयपीएस तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा भोवला

Last Updated:

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता. नाट्यमय ठरलेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मात्र, या दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान मोठा राडा झाला होता. नाट्यमय ठरलेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. मात्र, या दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या राड्याचे पडसाद विधीमंडळातही उमटेल होते. अखेर या प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
आयपीएस तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा भोवला
आयपीएस तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा भोवला
advertisement

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेला राडा अखेर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या ऐवजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

advertisement

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे ६५ पैकी ३५ जागांचे स्पष्ट बहुमत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि एका अपक्ष सदस्याला आपल्या गोटात खेचत सत्तांतर घडवून आणले. या राजकीय घडामोडींदरम्यान मोठा गोंधळ उडाला. शिवसेना शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला होता.

advertisement

मंत्र्यांचा संताप आणि विधानसभेत पडसाद

या राड्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी या प्रकरणाचे पडसाद थेट विधीमंडळात उमटवले. पोलीस अधीक्षकांनी घरगड्या सारखं काम केलं असल्याचा आरोप देसाई यांनी केला होता. मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल त्यांनी केला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेत्यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara ZP Eleciton : आयपीएस तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा भोवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल