TRENDING:

Background मध्ये चालू असलेले Apps खरंच बॅटरी खातात का? याचं सत्य जाणून धक्का बसेल

Last Updated:
खरंच असं वारंवार ॲप्स बंद केल्याने बॅटरी वाचते का? की ही केवळ एक चुकीची समजूत आहे? तंत्रज्ञानाच्या भाषेत याचं उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
1/9
Background मध्ये चालू असलेले Apps खरंच बॅटरी खातात का? याचं सत्य जाणून धक्का बसेल
दिवसभर आपल्या हातात स्मार्टफोन असतो. कधी व्हॉट्सॲप, कधी फेसबुक, तर कधी कामाचे ई-मेल्स... आपण एकामागून एक अनेक ॲप्स उघडत जातो. पण काम झालं की आपल्यापैकी अनेकांना एक सवय असते- ती म्हणजे फोनच्या रीसेंट टॅबमध्ये जाऊन सर्व ॲप्स एका झटक्यात क्लिअर करण्याची. आपल्याला वाटतं की असं केल्यामुळे फोनची बॅटरी वाचेल आणि फोन हँग होणार नाही.
advertisement
2/9
पण, खरंच असं वारंवार ॲप्स बंद केल्याने बॅटरी वाचते का? की ही केवळ एक चुकीची समजूत आहे? तंत्रज्ञानाच्या भाषेत याचं उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
advertisement
3/9
बॅकग्राउंडमध्ये ॲप्स नक्की काय करतात?जेव्हा तुम्ही एखादं ॲप वापरून होम स्क्रीनवर परत येता, तेव्हा ते ॲप पूर्णपणे बंद होत नाही. ते सस्पेंड मोडमध्ये जातं. याचा अर्थ असा की, ते ॲप बॅटरी किंवा प्रोसेसरचा वापर करणं थांबवतं, पण सिस्टीम त्याला अशा स्थितीत ठेवतं की जेव्हा तुम्ही पुन्हा ते उघडाल, तेव्हा ते लगेच सुरू व्हावं.
advertisement
4/9
वारंवार ॲप्स क्लिअर करणं फायद्याचं की तोट्याचं?अनेकांना वाटतं की बॅकग्राउंडमध्ये ॲप्स सुरू राहिले तर बॅटरी संपते, पण वास्तव याच्या उलट आहे.
advertisement
5/9
जास्त पॉवर लागते: जेव्हा तुम्ही एखादं ॲप पूर्णपणे बंद करता आणि पुन्हा उघडता, तेव्हा फोनला ते 'झिरो'पासून सुरू करण्यासाठी जास्त ऊर्जा आणि प्रोसेसर पॉवर खर्च करावी लागते.
advertisement
6/9
बॅटरीवर ताण: वारंवार ॲप्स बंद करून पुन्हा उघडल्याने बॅटरी जास्त वेगाने संपते. हे अगदी तसंच आहे, जसं सिग्नलवर गाडीचं इंजिन चालू ठेवण्याऐवजी वारंवार बंद-चालू केल्याने जास्त इंधन जळतं.
advertisement
7/9
खरोखर बॅटरी खाणारे ॲप्स कोणते?सर्वच ॲप्स बॅटरीसाठी घातक नसतात. फक्त तेच ॲप्स बॅटरी संपवतात जे बॅकग्राउंडमध्ये सक्रियपणे काम करत असतात, जसे की:1. GPS आधारित ॲप्स: गुगल मॅप्स किंवा फूड डिलिव्हरी ॲप्स जे तुमचं लोकेशन ट्रॅक करतात.2. फिटनेस ट्रॅकर्स: जे तुमचे पावलं मोजण्यासाठी सतत सक्रिय असतात.3. सोशल मीडिया: जे सतत नवीन नोटिफिकेशन्स आणि डेटा रिफ्रेश करत असतात.
advertisement
8/9
बॅटरी वाचवण्याचा योग्य मार्ग कोणता?जर तुम्हाला खरोखरच फोनची बॅटरी टिकवायची असेल, तर ॲप्स बंद करण्याऐवजी या गोष्टी करा:- स्क्रीनचा ब्राइटनेस गरजेनुसार ठेवा.- अनावश्यक ॲप्सना दिलेली लोकेशन आणि बॅकग्राउंड डेटाची परमिशन बंद करा.- फोनमधील 'Battery Optimization' किंवा 'Adaptive Battery' फिचरचा वापर करा.
advertisement
9/9
थोडक्यात काय तर, बॅकग्राउंडमध्ये दिसणारे ॲप्स हे तुमच्या फोनचे शत्रू नसून मित्र आहेत, जे तुमचा वेळ वाचवतात. त्यामुळे गरज नसेल तर ते वारंवार बंद करून बॅटरीवर ताण देऊ नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Background मध्ये चालू असलेले Apps खरंच बॅटरी खातात का? याचं सत्य जाणून धक्का बसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल