TRENDING:

'शॉर्ट टेम्पर्ड' असतात 'या' राशींच्या मुली, रागीट स्वभावामुळे मॅरीड लाइफमध्ये येतात चढउतार; तुमच्या पत्नीची रास नाही ना यात?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबावर राशीचा खोलवर परिणाम होतो. काही राशींच्या मुली स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ असतात, मात्र त्यांचा रागीट स्वभाव त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण करू शकतो.
advertisement
1/5
'शॉर्ट टेम्पर्ड' असतात 'या' राशींच्या मुली, रागीट स्वभावामुळे मॅरीड लाइफमध्ये येतात चढउतार; तुमच्या पत्नीची रास नाही ना यात?
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबावर राशीचा खोलवर परिणाम होतो. काही राशींच्या मुली स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ असतात, मात्र त्यांचा रागीट स्वभाव त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण करू शकतो. विशेषतः 4 राशींच्या मुलींच्या 'नाकावर राग' असतो, ज्यामुळे लग्नानंतर त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो.
advertisement
2/5
मेष - अतिउत्साह आणि घाई: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो अग्नी तत्त्वाचा ग्रह आहे. या राशीच्या मुली अत्यंत स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. लग्नानंतर जर त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर त्यांचा राग अनावर होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून जोडीदाराशी वाद घालण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या संसारात सुरुवातीला बरेच चढ-उतार येतात.
advertisement
3/5
कर्क - भावनिक आणि हळवा स्वभाव: कर्क राशीच्या मुली मनाने खूप संवेदनशील असतात, पण त्यांचा रागही तितकाच तीव्र असतो. जर त्यांना जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम किंवा आदर मिळाला नाही, तर त्या लगेच चिडतात किंवा स्वतःला कोंडून घेतात. त्यांच्या या 'मूड स्विंग्स'मुळे जोडीदाराला त्यांना समजून घेणे कठीण जाते, परिणामी नात्यात दुरावा निर्माण होतो.
advertisement
4/5
वृश्चिक - तीव्र राग आणि संशयी वृत्ती: वृश्चिक राशीच्या मुलींचा राग शांत असतो, पण तो अत्यंत घातक ठरू शकतो. त्या सहजासहजी कोणाला माफ करत नाहीत. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या एखाद्या चुकीमुळे त्या दीर्घकाळ रागावून राहू शकतात. त्यांचा हा स्वभाव नात्यातील पारदर्शकता कमी करतो आणि वादाला निमंत्रण देतो.
advertisement
5/5
मकर - जिद्दी आणि शिस्तप्रिय: मकर राशीच्या मुलींना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे आणि शिस्तीत हवी असते. जर कुटुंबात किंवा जोडीदाराकडून शिस्तीचे उल्लंघन झाले, तर त्या खूप कठोरपणे वागतात. त्यांच्या या जिद्दी स्वभावामुळे सासरच्या मंडळींशी आणि पतीशी त्यांचे खटके उडण्याची शक्यता जास्त असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
'शॉर्ट टेम्पर्ड' असतात 'या' राशींच्या मुली, रागीट स्वभावामुळे मॅरीड लाइफमध्ये येतात चढउतार; तुमच्या पत्नीची रास नाही ना यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल