TRENDING:

समुद्रात बुडणार होती अभिनेत्री, वाचवण्यासाठी धावला अक्षय कुमार; शूटिंगवेळीचा भयानक किस्सा

Last Updated:
Bollywood Actress : अक्षय कुमारसोबत फिल्मचं शूटिंग करताना अभिनेत्रीसोबत भयानक घडलं होतं. अभिनेत्रीने एका मुलाखतीत फिल्मचा भयानक किस्सा सांगितला आहे.
advertisement
1/7
समुद्रात बुडणार होती अभिनेत्री, वाचवण्यासाठी धावला अक्षय कुमार; शूटिंगवेळीचा भयानक किस्सा
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या भूत बंगला फिल्ममुळे चर्चेत आहे. यादरम्यान त्याच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीने त्याच्यासोबतच्या शूटिंगचा एक भयानक किस्सा सांगितला आहे. आपण मरता मरता वाचल्याचं ती म्हणाली.
advertisement
2/7
अभिनेत्रीची ही पहिलीच फिल्म, ज्यात ती अक्षय कुमारसोबत काम करत होती. फिल्मच्या गाण्याचं शूटिंग सुरू होतं. अभिनेत्रीने सांगितल्यानुसार फिल्मच्या गाण्याचं शूटिंग समुद्राच्या मधोमध सुरू होतं.
advertisement
3/7
अभिनेत्रीने सांगितलं की अचानक समुद्राच्या लाटा इतक्या जोरात आल्या की तिला सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही कळायच्या आत ती समुद्रात बुडाली. अभिनेत्री म्हणाली, "मी पाण्यात बुडत होते. मी लेदरचे कपडे घातले होते आणि मला अजिबात पोहता येत नव्हते, त्यामुळे मी दगडासारखी बुडू लागले."
advertisement
4/7
सुदैवाने तेव्हा लाराला वाचवण्यासाठी अक्षय कुमार धावला. त्याने तिला पाण्यातून बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचला, असं तिने सांगितलं. पाणी खूप थंड असल्याने अभिनेत्रीला हायपोथर्मिक शॉक बसला होता. तिची प्रकृती खालावत असल्याचं पाहू शूटिंग लगेच थांबवण्यात आलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
advertisement
5/7
ही अभिनेत्री आहे लारा दत्ता आणि ती फिल्म आहे अंदाज. लाराने जिने एशियन टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पहिल्याच फिल्मचा हा भयानक किस्सा सांगितला. 
advertisement
6/7
पण याच भीषण अपघाताने तिच्या कारकिर्दीला आकार दिल्याचंही ती म्हणाली. तिने सांगितलं यानंतर अक्षय कुमारने ब्लू या फिल्ममसाठी तिचं नाव सुचवलं. लाराला पाण्याची भीती वाटत असल्याने तिने थेट नकार दिला. पण अक्षय कुमारने तिला वयाच्या तिशीत डायव्हिंग शिकायला सांगितलं आणि ती शिकली आणि तिने अंदाजच्या शूटिंगवेळीच्या तिच्या जुन्या भीतीवर मात करत ब्लू फिल्ममधील आव्हानात्मक भूमिका उत्कृष्टपणे साकारली.
advertisement
7/7
अँथनी डिसूझा दिग्दर्शित 2009 साली रिलीज झालेली ब्लू ही फिल्म ज्यात लारासोबत संजय दत्त आणि झायेद खान होता. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फेल ठरली पण लारासाठी तो एक पर्सनल विजय होता. कारण पाण्याच्या भीती मात करत तिला नवीन धैर्य आणि आत्मविश्वास मिळाला. लारा दत्त शेवटची 2023 मध्ये 'इश्क-ए-नादान' या चित्रपटात दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
समुद्रात बुडणार होती अभिनेत्री, वाचवण्यासाठी धावला अक्षय कुमार; शूटिंगवेळीचा भयानक किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल