TRENDING:

हनुमान जयंतीचा उपवास कधी आणि कसा करावा? 'ही' आहे अचूक तारीख आणि पद्धत

Last Updated:
हिंदू धर्मात हनुमान जयंती हा दिवस अत्यंत उत्साह आणि भक्तीने साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. यंदा 2026 मध्ये हनुमान जयंतीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे.
advertisement
1/7
हनुमान जयंतीचा उपवास कधी आणि कसा करावा? 'ही' आहे अचूक तारीख आणि पद्धत
हिंदू धर्मात हनुमान जयंती हा दिवस अत्यंत उत्साह आणि भक्तीने साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. यंदा 2026 मध्ये हनुमान जयंतीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे.
advertisement
2/7
कारण पौर्णिमा तिथी दोन दिवसांत विभागली गेली आहे. मात्र, शास्त्रातील 'उदया तिथी' आणि हनुमानाचा पहाटे झालेला जन्म लक्षात घेता, उपवास आणि पूजेसाठी योग्य तारीख कोणती, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
3/7
पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07:07 वाजता सुरू होत आहे आणि ती 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 07:41 वाजता संपत आहे. हनुमान जयंती ही प्रामुख्याने सूर्योदयाच्या वेळी साजरी केली जाते.
advertisement
4/7
2 एप्रिल रोजी सूर्योदयाला पौर्णिमा तिथी असल्याने, गुरुवार, 2 एप्रिल 2026 रोजीच हनुमान जयंतीचा उपवास करणे आणि जन्मोत्सव साजरा करणे शास्त्रशुद्ध ठरेल. काही ठिकाणी 1 एप्रिलला पौर्णिमा सुरू होत असल्याने गोंधळ होऊ शकतो, पण मुख्य व्रत 2 एप्रिललाच असेल.
advertisement
5/7
हनुमानाचा उपवास हा कडक मानला जातो. हा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करावे. हनुमानासमोर दिवा लावून 'मी आज दिवसभर उपवास करून तुमची भक्ती करेन' असा संकल्प करावा.
advertisement
6/7
अनेक भाविक दिवसभर पाणी आणि फळे घेऊन उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पारण केले जाते. उपवासाच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत किंवा कोणाशीही वाद घालू नका.
advertisement
7/7
उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त वेळा 'हनुमान चालीसा', 'बजरंग बाण' किंवा 'राम रक्षा स्तोत्राचे' पठण करावे. या दिवशी मीठ खाणे टाळले तर उत्तम. तसेच लसूण, कांदा किंवा तामसी अन्नाचे सेवन अजिबात करू नका. काळ्या रंगाचे कपडे पूजेच्या वेळी परिधान करू नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
हनुमान जयंतीचा उपवास कधी आणि कसा करावा? 'ही' आहे अचूक तारीख आणि पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल