TRENDING:

Hanuman Jayanti 2026 : बटुक ते काट्या मारुती, नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत हे मंदिरे, हनुमान जयंतीला घ्या दर्शन, PHOTOS

Last Updated:
रामभक्त हनुमानाची देखील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. अशाच 6 मंदिरांबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7
बटुक ते काट्या मारुती, नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत हे मंदिरे, हनुमान जयंतीला घ्या दर्शन, PHOTOS
नाशिक शहराला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. याच नाशिकला धार्मिक नगरी म्हणून देखील ओळखली जाते. प्रभू रामचंद्रांचे वनवासाच्या काळात या परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या शहराला रामायणाशी संबंधित घडामोडींचं साक्षीदार असणारं शहर म्हणून ओळखलं जातं. रामभक्त हनुमानाची देखील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. अशाच 6 मंदिरांबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
गोमय मारुती: या मंदिराची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आगरटाकळी इथं स्वत:च्या हातांनी केली. या मंदिराला गोमय मारुती म्हणून ओळखलं जातं. समर्थ 12 वर्षे गोदाकाठी वास्तव्यास होते. इथं त्यांनी रामनामाचा जप केला. तसेच स्वत:च्या हाताने गोमय अर्थात गायीचे शेण आणि माती यांच्या मिश्रणातून हनुमान मूर्तीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं.
advertisement
3/7
दुतोंड्या मारुती: 1942 ला अहिल्याराम व्यायामशाळेसमोर दुतोंड्या मारुतीचे शिल्प उभारण्यात आले. दोन्ही दिशांना तोंड असल्याने या हनुमानाला दुतोंड्या मारुती म्हटले जाते. ही मूर्ती मूर्तिकार शंकरराव परदेशी यांनी बनवलेली आहे. आज हाच 11 फुटी दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे.
advertisement
4/7
बटुक हनुमान: हे मंदिर तपोवन परिसरात आहे. त्यात असलेली हनुमान मूर्ती कधीपासून आहे याबाबत कोणालाच कल्पना नाही. या हनुमान मूर्तीला बटुक हनुमान असं नाव श्यामसुंदर महाराज यांनी दिलं. श्यामसुंदर महाराज मुखातून नामस्मरण करत असताना बटुक हनुमान हे नाव निघाले होते. तेव्हापासून या हनुमानाला बटुक असे नाव पडले आहे.
advertisement
5/7
सोन्या मारुती: नाशिकच्या सराफ बाजारातील श्री सोन्या मारुतीचे मंदिरदेखील पुरातन आहे. सराफ बाजारातील मंदिर आणि तेही सोन्याचा मुलामा दिलेले. त्यामुळे सोन्यासारख्या चकाकणाऱ्या मंदिरातील या मूर्तीचा सोन्या मारुती नावाने परिचय आहे. या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. यासाठी अहमदाबाद आणि सुरत येथून कारागीर आले होते. त्यावेळीच उंचावर असलेल्या मंदिराला काहीसे खाली आणण्यात आले.
advertisement
6/7
काट्या मारुती: नाशिकमधील आडगाव नाक्याचा काट्या मारुती साडेअकरा फूट उंचीचा आहे. येथील मारुती लंबे हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर अत्यंत पुरातन आहे. या मूर्तीबद्दल अशी आख्यायिका आहे की द्वापारयुगात 12 वर्षांच्या वनवासात असलेल्या पांडवांना घनदाट जंगलात बाभळीच्या एका झाडाखाली ही मूर्ती मातीत सापडली होती.
advertisement
7/7
पनवती हनुमान: पनवती हा शब्द कुठलीही गोष्ट अशुभ आणि गमवणे या अर्थानं वापरला जातो. पूर्वी पनवती नावाची एक राक्षसीण होती. तिच्यामुळेच ही संज्ञा रूढ झाली. या राक्षसिणीचा वध हनुमानाने केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे गाडगे महाराज धर्मशाळेच्या खाली पनवती हनुमानाचे हे मंदिर आहे. यात हनुमान मूर्तीच्या पायाखाली पनवती राक्षसीण दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Hanuman Jayanti 2026 : बटुक ते काट्या मारुती, नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत हे मंदिरे, हनुमान जयंतीला घ्या दर्शन, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल