चलो शेगाव! गजानन महाराज मंदिर, वॉटर पार्क आणि बरंच काही! विदर्भातील उन्हाळी सहलीचं बेस्ट ठिकाण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
शेगाव हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. येथे श्री संत गजानन महाराज मंदिर हे प्रमुख आकर्षण आहे. मात्र त्यासोबतच आसपासची इतर ठिकाणंही तुमच्या ट्रिपला खास बनवतात.
advertisement
1/7

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. येथे श्री संत गजानन महाराज मंदिर हे प्रमुख आकर्षण आहे. मात्र त्यासोबतच आसपासची इतर ठिकाणंही तुमच्या ट्रिपला खास बनवतात.
advertisement
2/7
बाळापूर रोडवरील महालक्ष्मी मंदिर, शांत वातावरणातील कृष्णाजीचा मळा, दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची आर्ट गॅलरी आणि उन्हाळ्यातील मजेसाठी माऊली वॉटर पार्क हे सर्व पर्याय कमी खर्चात उपलब्ध आहेत.
advertisement
3/7
श्री संत गजानन महाराज मंदिर शेगावमधील हे मंदिर विदर्भातील सर्वात सुंदर आणि व्यवस्थित मंदिरांपैकी एक मानले जाते. स्वच्छता, शिस्त आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे भाविकांना समाधानाचा अनुभव मिळतो. येथे भक्तनिवासाची सोय असल्याने अगदी कमी खर्चात राहण्याची आणि जेवणाची सुविधा मिळते.
advertisement
4/7
कृष्णाजीचा मळा मंदिराजवळच असलेला कृष्णाजीचा मळा हा परिसर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे. येथे संत गजानन महाराजांनी चमत्कार दाखविल्याच्या कथा सांगितल्या जातात. परिसरात शिवमंदिर आणि मोठा वटवृक्षही पाहायला मिळतो.
advertisement
5/7
महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर हे मंदिर आकर्षक वास्तू आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात विविध दुकाने असून येथे प्रसिद्ध गांधीग्रामची गुळपट्टीही मिळते.
advertisement
6/7
आर्ट गॅलरी महालक्ष्मी मंदिराजवळील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खास आर्ट गॅलरी येथे आहे. टेराकोटा वस्तू, सुंदर फ्रेम्स आणि विविध हस्तकला पाहण्याची संधी मिळते, ही जागा प्रेरणादायी ठरते.
advertisement
7/7
माऊली वॉटर पार्क उन्हाळ्यात मजा करायची असेल तर माऊली वॉटर पार्क हा उत्तम पर्याय आहे. येथे विविध ॲक्टिव्हिटीज, कॅफेटेरिया, चेंजिंग रूम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तिकीट दर साधारण 700 ते 800 रुपये प्रति व्यक्ती आहे. एकंदरीत, शेगावमध्ये तुम्हाला देवदर्शन, निसर्ग आणि मनोरंजन, तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. त्यामुळे या उन्हाळ्यात कुटुंबासोबत कमी बजेटमध्ये आनंददायी ट्रिपसाठी शेगावला नक्की भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
चलो शेगाव! गजानन महाराज मंदिर, वॉटर पार्क आणि बरंच काही! विदर्भातील उन्हाळी सहलीचं बेस्ट ठिकाण