TRENDING:

Fridge Cleaning : फ्रिजचा रबर काळा पडलाय? टेन्शन NOT, 'या' 3 घरगुती उपायांनी मिनिटांत करा चकाचक

Last Updated:
अनेकदा फ्रीज बाहेरून चकचकीत दिसतो, पण जेव्हा आपण त्याचा दरवाजा उघडतो, तेव्हा बाजूच्या पांढऱ्या रबरवर काळे डाग, तेलकट थर आणि चिकट घाण साचलेली दिसते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हीच छोटीशी चूक तुमच्या फ्रीजचं आयुष्य कमी करू शकते.
advertisement
1/10
Fridge Cleaning : फ्रिजचा रबर काळा पडलाय? टेन्शन NOT, 'या' 3 घरगुती उपायांनी मिनिटांत करा चकाचक
आजच्या धावपळीच्या युगात फ्रीज (Refrigerator) हा आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. रोज बाजार करणे शक्य नसल्यामुळे आठवड्याचा भाजीपाला असो, दूध-दही असो किंवा उरलेलं अन्न, आपण सर्व काही फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीज आहे म्हणून आपलं काम सोपं झालंय हे खरं, पण कधी विचार केलाय का की, याच फ्रीजची आपण हवी तशी काळजी घेतो का?
advertisement
2/10
अनेकदा फ्रीज बाहेरून चकचकीत दिसतो, पण जेव्हा आपण त्याचा दरवाजा उघडतो, तेव्हा बाजूच्या पांढऱ्या रबरवर काळे डाग, तेलकट थर आणि चिकट घाण साचलेली दिसते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हीच छोटीशी चूक तुमच्या फ्रीजचं आयुष्य कमी करू शकते. जर तुमच्या फ्रीजचं कुलिंग (Cooling) कमी झालं असेल किंवा दरवाजा वारंवार उघडत असेल, तर त्याचं मुख्य कारण हे अस्वच्छ रबर असू शकतं. आज आपण जाणून घेऊया की, कोणत्याही महागड्या केमिकलशिवाय, घरच्या घरी हे रबर कसं साफ करायचं.
advertisement
3/10
फ्रीजच्या दरवाजाला जी रबरची पट्टी असते, तिला तांत्रिक भाषेत गॅस्केट म्हणतात. याचं काम फ्रीजमधील थंड हवा बाहेर जाऊ न देणं हे असतं. पण त्यावर घाण साचली की रबरची पकड ढिली होते आणि फ्रीज व्यवस्थित बंद होत नाही. थंड हवा बाहेर गेल्यामुळे फ्रीजला जास्त काम करावं लागतं, परिणामी लाईट बिल वाढतं. साचलेली बुरशी आणि घाण तुमच्या अन्नावाटे शरीरात जाऊन आरोग्याला धोका निर्माण करू शकते.
advertisement
4/10
हे क्लिन कस करायचं?तुमचा फ्रीज पुन्हा नव्यासारखा चमकवण्यासाठी तुम्हाला कोणा इलेक्ट्रिशीयनला बोलावण्याची किंवा महागड्या वस्तू आणण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातील या गोष्टी पुरेसा आहेत:
advertisement
5/10
1. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस (Baking Soda & Lemon)दोन मोठे चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात गरजेनुसार लिंबाचा रस मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट रबरच्या पट्टीवर सर्व बाजूंनी लावा आणि 5 ते 10 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासून ओल्या कपड्याने पुसून टाका. काळे डाग क्षणार्धात गायब होतील.
advertisement
6/10
2. टूथपेस्टचा वापर (Toothpaste Trick)टूथपेस्टमध्ये असलेले क्लिनिंग एजंट्स जिद्दी डाग काढण्यासाठी उत्तम असतात. थोडी टूथपेस्ट ब्रशवर घेऊन रबरच्या पट्टीत जिथे काळी घाण साचली आहे तिथे घासा. टूथपेस्टमुळे चिकटपणा लगेच निघून जातो. शेवटी ओल्या सुती कापडाने रबर पुसून कोरडं करा.
advertisement
7/10
3. व्हाईट व्हिनेगर (White Vinegar Spray)एका स्प्रे बाटलीत थोडं पाणी आणि 5-6थेंब व्हिनेगर मिक्स करा. हे द्रावण रबरवर स्प्रे करा. व्हिनेगरमधील आम्लधर्मी गुणधर्मामुळे रबरवरील फंगस (बुरशी) आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. 2 मिनिटांनंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतल्यास रबर एकदम निर्जंतुक आणि स्वच्छ होईल.
advertisement
8/10
फ्रीजचं आयुष्य वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करामहिन्यातून किमान दोनदा रबरची पट्टी वरीलपैकी एका उपायाने साफ करा.रबर साफ केल्यानंतर ते ओलं ठेवू नका, सुक्या कापडाने नीट पुसून घ्या.फ्रीजचा दरवाजा जोरात आपटण्याऐवजी हळू बंद करा, ज्यामुळे रबरची लवचिकता टिकून राहील.
advertisement
9/10
स्वयंपाकघरातील स्वच्छता केवळ भांड्यांपुरती मर्यादित नसते. फ्रीजच्या रबरसारख्या छोट्या भागाकडे लक्ष दिल्यास तुमचा फ्रीज वर्षानुवर्षे चांगला चालेल आणि तुमची वीजही वाचेल. मग वाट कसली पाहताय? आजच आपला फ्रीज तपासा आणि त्याला द्या एक फ्रेश' लूक.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fridge Cleaning : फ्रिजचा रबर काळा पडलाय? टेन्शन NOT, 'या' 3 घरगुती उपायांनी मिनिटांत करा चकाचक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल